चीनमध्ये भीषण दुर्घटना! महामार्गाचा भाग कोसळल्याने २४ जणांचा मृत्यू, तर ३१ जण जखमी

वृत्तसंस्था, बीजिंग : चीनच्या ग्वांगडोंग प्रांतात कोसळलेल्या पावसामुळे बुधवारी पहाटे महामार्गाचा एक भाग कोसळून २४ जण ठार झाले. पाच दिवसांच्या कामगार दिनाच्या सुट्टीच्या प्रारंभीच ही दुर्घटना घडली.

ग्वांगडोंगच्या उत्तरेकडील मीझोउ शहराच्या डाबू काउंटीमध्ये पहाटे २ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. भूस्खलन झाल्याने डोंगराळ भागातून गेलेल्या महामार्गाचा जवळपास १८ मीटरचा भाग दरडीसह खालील जंगलात कोसळला. त्यामुळे २० वाहनांसह एकूण ५४ प्रवासी दरडीखाली दबले गेले, असे वृत्त हाँगकाँग येथील ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने स्थानिक प्रशासनाच्या हवाल्याने दिले आहे. ३१ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्या जीवाला धोका नसल्याचे वृत्त शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने दिले आहे.

डमी उमेदवार, वंचितकडून भाजपचा उमेदवार दिला, ५ लाख मतांनी निवडून येणारे घाबरले का? करण पवारांचा सवाल

चीनमधील चार मोठ्या सुट्ट्यांपैकी एक असलेली कामगार दिनाची पाच दिवसांची सुट्टी बुधवारपासून सुरू झाली. या सुट्टीनिमित्त चीनमधील सर्व महामार्ग टोलमुक्त करण्यात आले आहेत. त्यामुळे महामार्गांवर प्रचंड वाहतूक असतानाच हा अपघात झाला आहे. दरम्यान, बचाव व मदतकार्य पूर्ण होईपर्यंत हा महामार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. या दुर्घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून तपास सुरू असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

Source link

China highway accidentChina Highway CollapseChina Highway Collapse deathchina newsinternational newsSouth China Morning Post
Comments (0)
Add Comment