ईडीच्या चौकशीवेळी आनंदराव अडसुळांची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखलं केलं

हायलाइट्स:

  • आनंदराव अडसूळ यांच्या अडचणीत वाढ
  • ईडीकडून कांदिवलीच्या घरी छापेमारी
  • अडसूळ यांची तब्येत बिघडली

मुंबईः शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने समन्स बजावले आहेत. आज चौकशीसाठी ईडीचे अधिकारी अडसूळ यांच्या कांदिवलीच्या घरी दाखल झाले होते. अडसूळ यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. मात्र, अचानक अडसूळ यांची तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

आनंदरावर अडसूळ यांनी बीपी व शुगरचा त्रास असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळं आज त्यांची तब्येत अचानक बिघडली. आनंदराव अडसूळ यांना गोरेगावच्या लाईफ केअर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, ईडीचे अधिकारी सकाळीच अडसूळ यांच्या घरी पोहचल्याची माहिती आहे. त्याचबरोबर आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ यांनाही ईडीने समन्स बजावल्याची माहिती आहे.

वाचाः शिवसेनेला आणखी एक धक्का; माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स

अडसूळांवर नेमके आरोप काय?

सीटी बँकेमध्ये कामगार, पेंशनधारक, ९९ टक्के मराठी लोकांची खाती होती. त्यातील जवळपास ९ हजार खातेधारक होतो. त्या बँकेतील खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले. त्यात अडसूळांनी २० टक्के कमिशन घेतले. त्यामुळं बँक पूर्ण बुडाली. यामध्ये जवळपास ९८० कोटींचा घोटाळा झाला आहे, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे.

वाचाः शिवसेना नेत्यांमागे ईडीचा ससेमिरा; ‘हे’ नेते रडारवर

दरम्यान, आनंदराव अडसूळ यांच्या कांदिवलीच्या घरी ईडीने छापेमारी केल्यानंतर त्यांच्या अमरावतीच्या नवसारी घरावरही ईडीने छापा टाकल्याची चर्चा होती. मात्र, अमरावती येथील त्यांच्या घरी ईडीने छापा टाकला नसल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.

Source link

anandrao adsul ed caseआनंदराव अडसूळआनंदराव अडसूळ मराठी बातम्याईडी चौकशीशिवसेना
Comments (0)
Add Comment