व्हॉट्सॲपकडून एक नवीन फीचर आणले जात आहे, जे फ्रेंड्स पार्टी करताना मजा आणेल. वास्तविक, व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि कम्युनिटीजसाठी हे इव्हेंट फीचर जोडले जात आहे. वीकेंड पार्टी करणाऱ्यांसाठी हे फिचर उपयुक्त ठरेल. तुमच्या पण ग्रुपमधला एक मित्र आहे जो अनेकदा शेवटच्या क्षणी ट्रिप रद्द करतो. असे मित्र अनेकदा सहलीच्या तारखा विसरतात त्यांच्यासाठी WhatsApp ने एक खास फीचर आणले आहे.
तयार करा ट्रिपचे शेड्युल
व्हॉट्सॲपच्या नवीन इव्हेंट फीचरमध्ये तुम्ही कोणत्या दिवशी कुठे जायचे आहे याचे शेड्यूल तयार करू शकता. Gmail प्रमाणे, कार्यक्रमातील सहभागी हो आणि नाही असे उत्तर देऊ शकतील. ज्या मित्रांनी हो म्हटले आहे, त्यांना वेळोवेळी रिमायंडर पाठवली जातील, जेणेकरून ते ट्रिपची तारीख विसरणार नाहीत. तसेच, यामध्ये ट्रिपला तुमच्यासोबत कोण कोण जात आहे याचेही डीटेल्स असतील .जीमेलमध्येही असेच फिचर दिलेले आहे. अशा स्थितीत जीमेलचे टेन्शन वाढले आहे.
व्हॉट्सॲपचे नवीन रिस्ट्रिक्शन फीचर
व्हॉट्सॲप एक नवीन अकाउंट रिस्ट्रिक्शन फीचर आणत आहे. तुमच्याकडून चूक झाल्यास हे फीचर तुमचे व्हॉट्सॲप अकाउंट काही काळासाठी बॅन करेल. वास्तविक, व्हॉट्सॲपचे धोरण अतिशय कडक आहे, ज्या अंतर्गत नियमांचे उल्लंघन झाल्यास खाते बंद केले जाते. मात्र, आता व्हॉट्सॲप अकाउंट कायमचे बॅन होणार नाही. त्याऐवजी, खाते काही काळ ब्लॉक केले जाईल, ज्यामुळे कोणीही चॅटिंग किंवा कॉलिंग करू शकणार नाही.
व्हॉट्सॲपवर बंदी ऐवजी निर्बंध घालण्यात येणार आहेत
नवीन फीचर अद्याप डेव्हलपिंग फेजमध्ये आहे. मात्र, त्याची बीटा आवृत्ती लवकरच बाजारात आणली जाण्याची शक्यता आहे. असे मानले जाते की मेटा मालकीच्या प्लॅटफॉर्मला वाटते की खात्यावर बंदी घालणे हा उपाय नाही. त्याऐवजी, खाते प्रतिबंधित केले जाईल, जेणेकरून युजर्सना त्यांची चूक लक्षात येईल. तसेच, काही कालावधीनंतर, युजर्स आपले अकाउंट पुन्हा वापरू शकतील.
व्हॉट्सॲप एक पॉपअप मेसेज देईल
WeBetaInfo रिपोर्टनुसार, आगामी फीचरच्या रोलआउटनंतर, जर तुम्ही काही चूक केली तर तुमचे खाते बॅन केले जाईल. तसेच, खात्यावर एक पॉपअप बॉक्स दिसेल, जो तुमचे खाते किती दिवसांसाठी बॅन केले जाईल हे सांगेल.
खात्यावर बंदी का आली हे सांगेल
मेसेजिंग ॲप खात्यावर बंदी का घालण्यात आली आहे हे स्पष्ट करेल, उदाहरणार्थ, जर तुम्ही स्पॅम मेसेज पाठवले असतील किंवा ऑटोमॅटिक मेसेज आणि मोठ्या प्रमाणात मेसेज पाठवले असतील तर तुमच्या खात्यावर बंदी घातली जाऊ शकते.
खात्यावर किती दिवस बंदी घालण्यात येईल
खाते प्रतिबंधित असताना, युजर्स 1 तास ते 24 तास अशा मर्यादित कालावधीसाठी चॅट करू शकणार नाहीत. हा एक प्रकारचा दंड असेल. तथापि, प्रतिबंधित खातेधारकांना मेसेज प्राप्त होत राहतील.