Brij Bhushan Singh: विद्यमान खासदार बृजभूषण सिंह यांचे तिकीट कापले; भाजपचा कैसरगंजमधील नवा उमेदवार…

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक २०२४साठी भाजपने आज गुरुवारी उत्तर प्रदेशमधील दोन मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. यात रायबरेली आणि कैसरगंज मतदारसंघांचा समावेश आहे. भाजपने कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे विद्यमान खासदार बृजभूषण शरण सिंह यांचा पत्ता कट केला आहे.

गेल्या वर्षभरापासून बृजभूषण सिंह हे कुस्तीपटूंनी केलेल्या आरोपामुळे चर्चेत होते. देशासाठी पदक जिंकणाऱ्या कुस्तीपटूंनी त्यांच्या विरोधात मोठे आंदोलन केले होते. तेव्हा मोदी सरकारवर ते बृजभूषण सिंह यांना पाठिशी घालत असल्याचा आरोप महिला कुस्तीपटूंनी केला होता. आता पक्षाने त्यांना लोकसभेचे तिकीट नाकारले आहे. भाजपने बृजभूषण सिंह यांचे तिकीट कापले असले तरी नवा उमेदवार त्यांच्या घरातील आहे. पक्षाने बृजभूषण सिंह यांचा पुत्र करण भूषण या बृजभूषण यांच्या छोट्या मुलाला उमेदवारी दिली आहे.

भाजपने कैसरगंज सोबत गांधी कुटुंबियांचा पारंपारिक बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या रायबरेली मतदारसंघातून देखील उमेदवार जाहीर केला. या मतदारसंघातून पक्षाने राज्यातील योगी सरकारमधील मंत्री दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी दिली आहे.
मी आणि फडणवीसांनी मिळून मटण खाल्लं; मटण खाणाऱ्या ब्राह्मणांचा शाप लागत नाही- नाना पटोलेनी पुन्हा डिवचले

रायबरेली आणि कैसरगंज लोकसभा मतदारसंघात पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. हे मतदान २० मे रोजी होईल. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही मतदारसंघातून कोणाला उमेदवारी द्यायची यावरून चर्चा सुरू होती.

महिला कुस्तीपटूंनी केलेल्या गंभीर आरोपामुळे बृजभूषण सिंह यांचे तिकीट कापले जाईल अशी चर्चा सुरू होती. कैसरगंजमधून त्यांच्या मुलाला तिकीट मिळू शकते असे देखील बोलले जात होते. रायबरेलीमधून भाजपने योगी सरकारमधील मंत्री दिनेश प्रताप सिंह यांना तिकीट दिले आहे. दिनेश सिंह एकेकाळी गांधी कुटुंबियांच्या जवळचे होते. हा मतदारसंघ भाजपसाठी फार महत्त्वाचा नाही. कारण हा मतदारसंघ गांधी कुटुंबियांचा पारंपारिक मतदारसंघ मानला जातो. दिनेश सिंह हे रायबरेली तालुक्याशी संबंधित असले तरी त्यांचे या मतदारसंघावर इतकीही पकड नाही की ते गांधी कुटुंबाचा पराभव करतील. काँग्रेसने या मतदारसंघातून अद्याप उमेदवारी जाहीर केलेली नाही. सोनिया गांधी यांनी राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतल्याने आता या मतदारसंघातून प्रियंका किंवा राहुल गांधी यांचे नाव चर्चेत आहे.
आम्ही लहान असताना मला आजी आजोबांनी सांगितले होतं, तेव्हा पवार साहेबांनी अख्ख्या कुटुंबाच्या विरोधात भूमिका घेतली होती- अजित पवार

कोण आहेत करण भूषण

करण भूषण हे बृजभूषण सिंह यांचे छोटे पूत्र आहेत. त्यांचे मोठे पूत्र प्रतीक हे भाजपचे आमदार आहेत. करण भूषण सिंह हे उत्तर प्रदेश कुस्ती संघाचे अध्यक्ष आहेत. त्याच सोबत ते सहकारी ग्राम विकास बँक नवाबगंज गौंडाचे अध्यक्ष आहेत. ही त्यांची पहिलीच निवडणूक आहे.

कैसरगंज मतदारसंघाचे अनेक वर्ष प्रतिनिधीत्व करणाऱ्या बृजभूषण सिंह यांना ३ मुले आणि १ मुलगी आहे. करण सिंह हे सर्वात छोटे पूत्र आहेत. त्यांचा जन्म १३ डिसेंबर १९९० रोजी झाला असून करण यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. करण यांनी नेमबाजीत डबल ट्रॅप प्रकारात राष्ट्रीय स्तरावर भाग घेतला आहे. त्यांनी गोंडामधून वडीलांनी स्थापन केलेल्या नंदिनी महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतले आहे.

Source link

bjp candidate from kaiserganjbrij bhushan sharan singhkaran bhushan singhloksabha election 2024mp brij bhushan sharan singhकरण भूषण सिंहकैसरगंज लोकसभा मतदारसंघबृजभूषण शरण सिंहलोकसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment