‘शेनझो 17’ हे अंतराळ यान गेल्या वर्षी 25 ऑक्टोबरला लाँग मार्च 2एफ रॉकेटच्या मदतीने लाँच करण्यात आले होते. साडेसहा तासांचा प्रवास करून ते तिआंगॉन्ग स्पेस स्टेशनवर पोहोचले. मोहिमेतील तांग होंगबो, तांग शेंगजी आणि जियांग झिनलिन हे तिन्ही क्रू मेंबर्स निरोगी आणि सुरक्षित असल्याचे चीनची अंतराळ संस्था शिन्हुआने म्हटले आहे.
‘शेनझो 17’
‘शेनझो 17’ हे अंतराळ यान गेल्या वर्षी 25 ऑक्टोबरला लाँग मार्च 2एफ रॉकेटच्या मदतीने लाँच करण्यात आले होते. साडेसहा तासांचा प्रवास करून ते तिआंगॉन्ग स्पेस स्टेशनवर पोहोचले. Space.com ने अहवाल दिला की,, ‘शेन्झोऊ 17’ मोहिमेचा भाग असलेले अंतराळवीर हे तियांगाँग स्पेस स्टेशनवर पोहोचणारे सर्वात तरुण अंतराळवीर होते. मिशनच्या प्रक्षेपणाच्या दिवशी तांग होंगबो 48 वर्षांचे होते. तांग शेंगजी 34 वर्षांचे होते आणि जियांग 35 वर्षांचे होते.
अंतराळवीरांनी केले विज्ञानाचे अनेक प्रयोग
या शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या खालच्या कक्षेत ६ महिने घालवले. विज्ञानाचे अनेक प्रयोग केले. दोन स्पेसवॉकही केले. अंतराळवीरांनी तिआंगॉन्ग स्पेस स्टेशनच्या सोलर ॲरेचीही दुरुस्ती केली. मायक्रोमेटीओरॉइड हल्ल्यात सौर पॅनेलचे नुकसान झाले होते.
काय आहे तिआंगॉन्ग स्पेस स्टेशन
हे अंतराळ स्थानक पृथ्वीपासून 340 ते 450 किलोमीटर उंचीवर आहे. 2021 मध्ये प्रथमच अंतराळवीरांची टीम तियांगॉन्ग स्पेस स्टेशनवर पोहोचली आणि तेथे 90 दिवस घालवले. तिआंगॉन्ग स्पेस स्टेशन हे ५५ मीटर उंच स्टेशन आहे. त्याचे वजन 77 टन आहे. अमेरिका आणि रशियाचे वर्चस्व असलेल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपेक्षा ते 20 टक्के मोठे आहे. या अंतराळ स्थानकावर अनेक प्रयोगही केले जात आहेत. चीनच्या स्पेस एजन्सीला हे स्पेस स्टेशन किमान एक दशक चालवायचे आहे.
स्पेस मिशन क्षेत्रात चीनची आगेकूच
चीनने 2003 मध्ये पहिल्या क्रुयुड स्पेस मिशनचे आयोजन केले होते, त्याच्या स्वत:च्या संसाधनांचा वापर करून व्यक्तीला अंतराळात नेणारा चीन हा माजी सोव्हिएत युनियन आणि यूएस नंतरचा तिसरा देश बनला.
यूएस स्पेस प्रोग्रामला अजूनही आपण खर्च, सप्लाय चेन आणि आणि आपल्या क्षमतांमुळे चीनपेक्षा वरचढ असल्याचे वाटते . तथापि, चीनने मात्र काही क्षेत्रात हे खोटे ठरविले आहे. चीनने दशकामध्ये प्रथमच चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने परत आणले आहेत तसेच चंद्राच्या कमी माहिती असलेल्या भागात रोव्हर उतरवण्याची किमया साधली आहे. दुसरीकडे SpaceX आणि Blue Origin सारख्या खाजगी क्षेत्रातील कंपन्यांच्या सहाय्याने क्रूड मिशन्सच्या नवीन बांधिलकीचा भाग म्हणून 2025 च्या अखेरीस चंद्राच्या पृष्ठभागावर क्रू परत आणण्याचे यूएसचे उद्दिष्ट आहे.