anandrao adsul: ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचा डाव; अडसुळांवरील कारवाईबाबत वडेट्टीवार बोलले

हायलाइट्स:

  • भाजपकडून ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचे काम- विजय वडेट्टीवार.
  • जात पडताळणी संदर्भात कारवाईचा बदला घेण्यासाठी राणा यांनी अडसुळांविरोधात तक्रार केली- विजय वडेट्टीवार
  • याच कारणामुळे अडसूळ यांच्यावर ही कारवाई झाली- विजय वडेट्टीवार.

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

ईडीच्या माध्यमातून महाविकास आघाडीला अस्थिर करण्याचे काम भाजपकडून केला जात आहे, असा आरोप आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी औरंगाबादेत केला. राणा यांच्या विरोधात जात पडताळणी संदर्भात कारवाई झाली होती. त्याचा बदला घेण्यासाठी आमदार रवी राणा यांनी अडसुळांविरोधात तक्रार केली आणि ही कारवाई झाल्याचेही ते म्हणाले. (Vijay Vadettivar has said that it is a ploy to destabilize the Mahavikas Aghadi through ED)

मंत्री वडेट्टीवार औरंगाबादमध्ये आले असता पत्रकारांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले, ईडीने अडसुळांवरील केलेली कारवाई असो किंवा इतरांवर केलेली कारवाई हा सरकारला अस्थिर करण्याचा डाव आहे. सुपारी घेऊन काही जण काम करत आहेत. काय बोलतो आहोत, काय आरोप याचे भान त्यांना नाही. अशा बदलाच्या भावनेतून, सुडबुद्धीने राजकारण कधी नव्हते, ही पद्धत नव्याने राज्यात, देशात रुजते आहे. सुडबुद्धीने काम केले जात आहे हे जनता ओळखून आहे. अडसुळांवरील कारवाई ही अशाच प्रकारची आहे. अशा कारवाईमुळे महाविकास आघाडीला काही धोका नसून सरकार अधिक मजबूत होईल असे ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- ‘जातीय, धार्मिक अहंकार वाढत आहे. एक पिढी सोशल मीडियावर फॉरवर्डच्या नादात अडकली आहे’

अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचे पंचनामे आठवड्यात पूर्ण होतील. एसडीआरएफच्या निकषाप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत १३ हजार ६०० रुपये ही मदत राज्यशासन देणार आहे, असेही वडेट्टीवार पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-शिवसेना पवारांचा गड भेदणार?; संजय राऊत यांचे बारामतीबाबत मोठे वक्तव्य

केंद्राकडून अपेक्षित मदत नाही

राज्यसरकारासोबत केंद्राने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी पुढे यावे असेही वडेट्टीवार म्हणाले. मागील तीन वर्षात जी मदत अपेक्षित होती ती मिळाली नाही. केंद्राकडे सात हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला, पाहणी पथकासाठीही पाठपुरावा केला गेला. त्यात पुन्हा नव्याने ही परिस्थिती उद्धभवली. इथे ही मानसेच राहतात. मतदार गृहित धरून केंद्राने काम करू नये, असेही ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- अजित पवारांनी ऐकले नाही तर त्यांना सांगावे लागेल; राऊत यांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा

Source link

Anandrao AdsulMLA Ravi RanaVijay Wadettiwarआनंदराव अडसूळआमदार रवी राणाविजय वडेट्टीवार
Comments (0)
Add Comment