व्हॉट्सअ‍ॅप-इंस्टाग्रामवरील डिलीट झालेले मेसेज वाचता येतात? ट्राय करा ‘ही’ ट्रिक

अनेकदा काही लोक तुम्ही वाचण्यापूर्वी त्यांचा मेसेज डिलीट करतात. त्यामुळे अनेकांचं मन अस्वस्थ होतं आणि डिलीट केलेल्या मेसेज मध्ये काय होतं याचाच विचार सुरु होतो. आता हीच अस्वस्थता थांबवण्यासाठी आम्ही एक पद्धत सांगणार आहोत जिच्यामुळे तुम्ही डिलीट केलेले मेसेज देखील वाचू शकता. यासाठी फक्त तुम्हाला तुमच्या फोनच्या सेटिंग आणि इंस्टाग्राम-व्हॉट्सअ‍ॅपमधील सेटिंग बदलावी.

इथे जाणून घ्या की तुम्ही इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअ‍ॅपवर डिलीट केलेला मेसेज कसा वाचता येईल. यासाठी पुढील प्रोसेस फॉलो करा.

व्हॉट्सअ‍ॅपवर डिलीट केलेले मेसेज कसे वाचायचे?

यासाठी सर्वप्रथम तुमच्या फोनच्या सेटिंग मध्ये नोटिफिकेशन ऑप्शनवर जा. तिथे अ‍ॅडव्हान्स सेटिंगच्या ऑप्शनवर क्लिक करा, त्यानंतर तुम्हाला नोटिफकेशन हिस्ट्रीचा ऑप्शन दिसेल जो बाय डिफॉल्ट डिसेबल असेल. तो ऑन करा. हा ऑन करताच व्हॉट्सअ‍ॅपच नव्हे तर स्टेट्स बारमध्ये आलेल्या सर्व नोटिफिकेशनची हिस्ट्री दिसू लागेल.

तसेच जर तुम्हाला इंस्टाग्रामचे डिलीटेड मेसेज वाचायचे असतील तर दोन पद्धती आहेत. यासाठी तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टी अ‍ॅपची आवश्यकता नाही. फक्त पुढील प्रोसेस फॉलो करा.

Instagram वरून डिलीट केलेले मेसेज कसे वाचायचे

व्हॉट्सअ‍ॅपचे डिलीट केलेले मेसेज तुम्ही सहज वाचू शकता आता इंस्टाग्रामचे डिलीट केलेले मेसेज कसे वाचता येतील ते पाहूया.

  • यासाठी फक्त तुमचं इंस्टाग्राम ओपन करा, उजव्या कॉर्नरवरील तीन लाइनवर क्लिक करा, इथे “YOUR ACTIVITY” ऑप्शन वर जा, तिथे तुम्हाला Download your information चा ऑप्शन दिसेल यात Request a download वर क्लिक करा.
  • मेटा तुम्हाला फाईल पाठवेल जी तुम्हाला ४ दिवसात डाउनलोड करावी लागेल, यामुळे चॅट बॉक्समध्ये मेसेज परत येणार नाहीत परंतु तुमच्याकडे जुन्या मेसेजचे रेफरेंस असतील तर ते पुन्हा मिळू शकतात.
  • तसेच तुम्ही फोनच्या नोटिफिकेशन हिस्ट्रीचा वापर देखील करू शकता. यासाठी फक्त तुम्हाला सेटिंगमध्ये जावं लागेल आणि अ‍ॅडव्हान्स सेटिंग सिलेक्ट करून “Notification History वर क्लिक करा.

अश्याप्रकारे तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामवरून डिलीट झालेले मेसेज इतर कोणत्याही अ‍ॅपविना सहज वाचू शकता. एक गोष्ट लक्षात असू द्या की ही ट्रिक तेव्हाच वापरता येईल जेव्हा या अ‍ॅप्समध्ये नोटिफिकेशन इन लोकेशन बार ऑप्शन ऑन असतो.

Source link

instagram trickwhatsapp deleted messageswhatsapp trickइंस्टाग्रामव्हॉट्सअॅपव्हॉट्सअ‍ॅप ट्रिक्स
Comments (0)
Add Comment