पार्सलचा बॉक्स कचऱ्यात फेकणे बंद करा, नाहीतर तुमच्यासोबतही घडू शकतो स्कॅम, पाहा कसा

आजवर तुम्ही फोन व ऑनलाईन होणाऱ्या सायबर गुन्ह्याबद्दल ऐकले असेल, परंतु आता स्कॅमर्स एक पाऊल पुढे गेले आहेत, ज्यामध्ये हे लोक कुरिअर कंपन्या आणि कुरिअर बॉईज यांचा वापर करत आहे. गेल्या काही वर्षात सर्वच क्षेत्रात तंत्रज्ञानाने भरारी घेतली आहे. त्याचा गैरवापर करून सायबर गुन्हेगार आता दररोज नवनवीन प्रकारे सामान्यांची फसवणूक करत आहेत.

सायबर स्कॅमर्सनं आता लोकांची फसवणूक करण्याचा एक नवीन मार्ग शोधला आहे, ज्यास पार्सल स्कॅम असे नाव देण्यात आले आहे आणि यामध्ये कुरिअर कंपनी आणि कुरिअर बॉय यांचा काहीही नकळत वापर केला जात आहे. जर तुम्हाला या फसवणुकीचे बळी व्हायचे नसेल तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया..

पार्सल स्कॅम म्हणजे काय आहे?

पार्सल स्कॅममध्ये सायबर गुन्हेगार कुरिअर कंपनीमार्फत येणाऱ्या पार्सलमधून तुमच्याशी संबंधित माहितीची चोरी करतात. अनेकवेळा तुम्ही तुमचे पार्सल रॅपर कचऱ्यात फेकले की त्यात असलेली माहिती त्यांच्या हातात सापडते. तसेच, काहीवेळा हे लोक काही वेळा कुरिअर कंपनी किंवा ई-कॉमर्स कंपनीच्या गोडाऊनमधून तुमच्या पार्सलवर असलेली माहिती चोरतात.

एकदा ही माहिती सायबर स्कॅमर्सच्या हाती आल्यानंतर, ते फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गांनी तिचा वापर करतात. ज्यामध्ये फसवणूक करणारे अनेकदा तुम्हाला ई-कॉमर्स कंपन्या, कुरिअर कंपन्या आणि कुरिअर बॉय म्हणून फोन करतात आणि बँकिंग माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतात.

पार्सल स्कॅमपासून स्वतःचा बचाव कसा करावा

* जेव्हाही तुम्ही एखाद्या ई-कॉमर्स कंपनीकडून ऑर्डर देता तेव्हा तुम्हाला त्याबद्दल माहिती दिली जाते आणि या पार्सलच्या डिलीवरीचा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचतो. तुम्ही या पार्सलची ऑनलाइनही ट्रॅकिंग करू शकता.

* तुमचे कोणतेही पार्सल आल्यावर तुम्ही त्याचे रॅपर कचऱ्यात फेकून देता. तुमच्याकडूनही अशी चूक होत असेल तर ती त्वरित थांबवावी. पार्सलचे रॅपर आणि तुमच्या विषयी माहिती असलेल्या कागद सार्वजनिक ठिकाणी फेकू नये.

अशा प्रकारचे स्कॅम टाळण्यासाठी, जागरूकता, सावधगिरी आणि सुरक्षा उपायांचा अवलंब करणे सर्वात महत्वाचे आहे. जसे ओटीपीद्वारे अनेक प्रकारे स्कॅम केले जाऊ शकतात. त्याचप्रमाणे फसवणूक टाळण्यासाठी पार्सल बॉक्स कधीही नष्ट न करता फेकून देऊ नका. तुमची आर्थिक माहिती कोणाशीही शेअर करू नका. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा मोबाईल कोणालाही देऊ नका जेणेकरून तो फॉरवर्ड कॉल करून OTP मिळवू शकेल.

Source link

courier companycyber criminalse-commerce companyonline trackingparcel scam
Comments (0)
Add Comment