तब्ब्ल 22.53 कोटी किमी अंतरावरून पृथ्वीवर आला ‘गूढ’ सिग्नल; जाणून घ्या कोणी पाठिवला इतक्या दुरून मेसेज

अमेरिकन अंतराळ संस्था नासाने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सायकी स्पेसक्राफ्ट लॉन्च केले होते. हे स्पेसक्राफ्ट सायकी नावाच्या लघुग्रहाबद्दल जाणून घेण्यासाठी लाँच करण्यात आले होते. खोल अंतराळात पोहोचल्यानंतर हे यान पृथ्वीला सिग्नल पाठवत आहे. अलीकडेच याने पृथ्वीपासून 22.53 कोटी किलोमीटर अंतरावरून शास्त्रज्ञांना एक सिग्नल पाठवला आहे. या स्पेसक्राफ्टमध्ये ‘डीप स्पेस ऑप्टिकल कम्युनिकेशन्स’ (डीएसओसी)सिस्टिम बसवण्यात आली आहे. अंतराळात लांब अंतरावर लेझर कम्युनिकेशन प्रस्थापित करणे हा त्याचा उद्देश आहे. ही सिस्टिम सध्याच्या सिस्टिमपेक्षा खूप वेगवान असल्याचे सांगितले जाते.

पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतराच्या 1.5 पट अंतर केले लेझरने कम्युनिकेशनने पार

DSOC प्रणालीने 22.53 कोटी किलोमीटर अंतरावरून पृथ्वीवर सिग्नल पाठवून आपली क्षमता सिद्ध केली आहे. एनडीटीव्हीच्या अहवालानुसार, लेझर कम्युनिकेशन डेमोने सायके स्पेसक्राफ्टच्या रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्रान्समीटरशी इंटरफेस केल्यानंतर 140 दशलक्ष मैल (सुमारे 225.3 दशलक्ष किलोमीटर) अंतरावरून इंजिनीरिंग डेटा यशस्वीरित्या पाठविला. हे अंतर पृथ्वी आणि सूर्य यांच्यातील अंतराच्या 1.5 पट आहे.

काय आहे लेसर बीम सिग्नल ?

साधारणपणे, खोल अवकाशात असलेले अवकाशयान जेव्हा पृथ्वीला सिग्नल पाठवतात तेव्हा त्यांची बँडविड्थ मर्यादित असते. लेझर बीम सिग्नल भविष्यातील मोहिमांसाठी उपयुक्त ठरू शकतात. नासाचे म्हणणे आहे की ही सिस्टम सध्याच्या अंतराळ कम्युनिकेशन सिस्टमच्या तुलनेत 10 ते 100 पट वेगाने मेसेज पोहोचवू शकते.

का विशेष आहे सायकी लघुग्रह ?

सायकी लघुग्रहाविषयी, असा अंदाज आहे की त्यात 10,000 क्वाड्रिलियन डॉलर किमतीचे लोखंड, निकेल आणि सोने असू शकते. एका क्वाड्रिलियनमध्ये 15 शून्य असतात. ट्रिलियन नंतर येणारा हा आकडा आहे. यावरून तुम्ही सायकीच्या किमतीचा अंदाज लावू शकता. या लघुग्रहाविषयी जाणून घेण्यासाठी नासाने मिशन सायकी सुरू केले आहे. तथापि, नासा या लघुग्रहातून कोणतीही मौल्यवान वस्तू काढणार नाही.

NASA च्या Voyager 1 ने पाठविला पाच महिन्यांनंतर मेसेज

NASA च्या Voyager 1, या सर्वात दूरच्या मानवनिर्मित अंतराळयानाने, नुकतेच सुमारे पाच महिन्यांच्या विरामानंतर त्याच्या ऑनबोर्ड इंजिनीअरींग सिस्टमचे आरोग्य आणि स्थिती याबद्दल अपडेट पाठवले.
अंतराळ यानाने नऊ महिन्यांत प्रथमच त्याच्या ऑनबोर्ड इंजिनीअरींग सिस्टमच्या आरोग्य आणि स्थितीबद्दल वापरण्यायोग्य डेटा पाठविण्याचे काम पुन्हा सुरू केले. नोव्हेंबरपासून प्रथमच, यूएस स्पेस एजन्सी, नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन (NASA), यानाला पुन्हा विज्ञान डेटा प्राप्त करण्यास आणि ऑपरेशन पुन्हा सुरू करण्यास सक्षम करण्यासाठी सज्ज आहे.नासाच्या अहवालानुसार, व्हॉयेजर 1 चा शेवटचा संदेश 14 नोव्हेंबर रोजी होता. तथापि, अंतराळ यानाने स्पेस एजन्सीच्या आदेश प्राप्त करणे सुरूच ठेवले आणि ते सामान्यपणे कार्य करत होते.

Source link

earthmysterious signalNasaगूढ संदेशनासापृथ्वी
Comments (0)
Add Comment