स्प्लिट एसी असते महाग
विंडो एसी कमी किंमतीत सहज ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही जागी मिळते. तर विंडो एसीच्या तुलनेत स्प्लिट एसीची किंमत जास्त असते. दोन्ही प्रकारच्या एसींपैकी कोण जास्त विजेची बचत करेल हे स्टार रेटिंगवर अवलंबून असतं. तसेच इन्व्हर्टर एसी नॉन इन्व्हर्टर एसी पेक्षा जास्त बचत करण्यास मदत करतात, हे लक्षात असू द्या.
मोठ्या खोलीसाठी स्प्लिट एसी
खोलीचा आकार आणि तुमचा एसी किती टनाचा आहे यावर कूलिंग अवलंबून असतं. त्यामुळे तुमच्या खोलीच्या आकाराला साजेसा एसी खरेदी करावा. पण जर तुमची खोली छोटी असेल तर चांगल्या कुलिंगसाठी विंडो एसी घ्या, तर स्प्लिट एसी भिंतीवर लावता येतो त्यामुळे जास्त जागेच्या कूलिंगसाठी स्प्लिट एसी योग्य ठरते. परंतु जास्त महत्व खोलीचा आकार आणि एसी टनची निवड याला द्या.
विंडो एसीचे इंस्टॉलेशन चार्जेस कमी
अनेक कंपन्या नवीन एसीच्या खरेदीवर इंस्टॉलेशन चार्जेस घेत नाहीत. परंतु काही कंपन्या इंस्टॉलेशन शुल्क आकारतात. जर तुम्ही विंडो एसी खरेदी केला तर इंस्टॉलेशन चार्ज कमी असेल आणि स्प्लिट एसी लावण्यासाठी तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतील. कारण स्प्लिट एसी मध्ये इनडोर यूनिट आणि आउटडोर यूनिट असे दोन यूनिट्स लावावे लागतात.
महागात पडू शकते स्प्लिट एसीचं सर्व्हिसिंग
एसी खरेदी करताना मेंटेनन्स आणि सर्व्हिसिंगचा विचार करणं आवश्यक आहे. कारण एसीला वेळावेळी सर्व्हिसिंगची आवश्यकता असते. जर सर्व्हिसिंग केलं नाही तर एसीचं आयुष्य कमी होतं जातं आणि त्याचा परिणाम कुलिंगवर देखील होऊ शकतं. विंडो एसीचा सर्विंग चार्ज कमी येतो तसेच एखाद्या व्यक्तीनं स्प्लिट एसीची सर्व्हिसिंग केली तर तेव्हा त्याला जस जास्त पैसे खर्च करावे लागू शकतात.