धरणगाव: तालुक्यातील मुसळी येथे सर्पदंशाने एकाचा मुत्यु झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, धरणगाव तालुक्यातील मुसळी येथील रहिवासी अरुण विजय मोरे वय ४१वर्षे यांचा सर्पदंश झाल्याने मुत्यु झाला.ही घटना शनिवारी सकाळी नऊ वाजता घडली.
मासेमारी उद्योगाची साधने काढण्यासाठी अरुण मोरे गेले असताना त्यांना विषारी सापाने चावा घेतला.ही घटना त्यांचा मुलगा कपील याच्या लक्षात आली त्यावेळी त्याने आपले वडील अरुण मोरे यांना बेशुद्धावस्थेत त्वरीत धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.मृत अरुण मोरे यांच्या पश्चात दोन मुले आहेत.