Vivo Y18 ची किंमत आणि उपलब्धता
Vivo Y18 मोबाइल दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये भारतीय बाजारात आला आहे. डिवाइसच्या ४जीबी रॅम व ६४जीबी स्टोरेज ऑप्शनची किंमत फक्त ८,९९९ रुपये ठेवण्यात आली आहे. Vivo Y18 चा ४जीबी रॅम व १२८जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शन फक्त ९,९९९ रुपयांचा आहे.
कलर ऑप्शन पाहता डिवाइससाठी युजर्सना स्पेस ब्लॅक आणि जेम ग्रीन सारखे दोन ऑप्शन मिळतील. जर तुम्ही Vivo Y18 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा ब्रँडच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. कंपनीनं या फोन सोबत आणखी एक मोबाइल Vivo Y18e देखील लाँच केला आहे.
Vivo Y18 चे स्पेसिफिकेशन्स
Vivo Y18 मध्ये ६.५६-इंचाचा एलसीडी एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रिजोल्यूशन १६१२×७२० पिक्सल आहे तर डेन्सिटी २६९पीपीआय पिक्सल. वॉटरड्रॉप नॉच डिजाइन असलेला हा डिस्प्ले ९०हर्ट्झ रिफ्रेश रेट, ८४०निट्स ब्राइटनेस, ८३% एन्टीएससी गॅमट आणि टीयूव्ही रीनलँड सर्टिफिकेशनसह आला आहे.
प्रोसेसिंगसाठी कंपनीनं मीडियाटेक हीलियो जी८५ चिपसेटचा वापर केला आहे, जो एक एंट्री लेव्हल चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी माली जी५२ जीपीयू मिळतो. त्याचबरोबर १२८जीबी पर्यंतची ईएमएमसी ५.१ स्टोरेज मिळते. ही स्टोरेज मायक्रोएसडी कार्ड स्लॉटच्या मदतीनं वाढवता येते. फोनमधील ४ जीबी एलपीडीडीआर४एक्स रॅम सोबत ४जीबी एक्सटेंडेड रॅमचा सपोर्ट आहे.
मोबाइलमध्ये ८ मेगापिक्सलचा सेल्फी शुटर मिळतो. तर मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि व्हीजीए सेन्सर देण्यात आला आहे. Vivo Y18 मध्ये ५,०००एमएएचची बॅटरी मिळते जी १५वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.
Vivo Y18 मोबाइल अँड्रॉइड १४ आधारित फनटच ओएस १४ वर चालतो. Vivo Y18 मध्ये साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. तर पाणी आणि धुळीपासून काहीप्रमाणात संरक्षण करण्यासाठी यात आयपी५४ रेटिंग देखील देण्यात आली आहे. फोनमध्ये ड्युअल-सिम, ४जी , वाय-फाय, ब्लूटूथ ५.०, जीपीएस, गॅलीलियो, आणि यूएसबी टाइप सी सपोर्ट आहे.