तेज पोलीस टाइम्स : परवेज शेख
Pune-फरासखाना पोलीस स्टेशन हद्दीत वारंवार होणाऱ्या वाहन चोरीच्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोो. प्रशांत भस्मे यांच्या आदेशाने दिनांक २२/०४/२०२४ रोजी तपास पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार पेट्रोलींग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार वैभव स्वामी, प्रविण पासलकर, समिर माळवदकर, संदीप कांबळे हे वाहन चोरीच्या अनुषंगाने सीसीटीव्ही कॅमेरे तपासत होते. सीसीटीव्ही फुटेज मध्ये वाहन चोरी करताना मिळता जुळता व्यक्ती भाजी मार्केट येथे आल्याची माहिती पोलीस अंमलदार समीर माळवदकर यांना मिळाली.पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशी त्याने फरासखाना पोलीस ठाण्याच्याहद्दीतील रविवार पेठ, नेहरू चौक, भाजी मार्केट, मंडई परिसरातुन दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच चोरलेल्यादुचाकी मुळगावी ठेवल्याचे सांगितले. पोलिसांनी 13 दुचाकी जप्त करुन गुन्हे उघडकीस आणले आहेत.आरोपीने फरासखाना -7, कोथरुड -2, चतु:श्रृंगी 1, विश्रामबाग पोलीस ठाण्यातील 3 असे एकूण 13 गुन्हे उघडकीस आले आहेत.
कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभागप्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, सहायक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलंडे यांच्या मार्गदर्शनाखालीवरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे, पोलीस निरीक्षक गुन्हे अजित जाधव, सहायक पोलीस निरीक्षक वैभव गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार रिजवान जिनेडी, समिर माळवदकर, राकेश क्षीरसागर,प्रवीण पासलकर, वैभव स्वामी, सुमित खुट्टे, संदीप कांबळे, मेहबुब मोकाशी, प्रमोद मोहिते, गणेश आटोळे, शशीकांत ननावरे,तुषार खडके, अजित शिंदे यांच्य पथकाने केली आहे.