बंगळुरू: एक खासदार एक विधान करुन जातो आणि त्याच्या विधानामुळे संपूर्ण पक्षच अडचणीत येतो. पंतप्रधान, गृहमंत्र्यांपासून त्या पक्षाच्या सर्वच मुख्यमंत्र्यांना, आमदारांना स्पष्टीकरण देत फिरावं लागतं. खासदाराच्या बोलंदाजीमुळे नोबॉल पडतो आणि विरोधकांना फ्री हिट मिळतो. त्यांच्याकडून तुफान बॅटिंग सुरु होते आणि सत्ताधाऱ्यांच्या अडचणी वाढतात.
वादग्रस्त विधान करणारा तो खासदार म्हणजे अनंतकुमार हेगडे, त्यांचा पक्ष म्हणजे भाजप. कर्नाटकातील भौगोलिकदृष्ट्या सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ असलेल्या कारवारमध्ये भाजपचा दबदबा आहे. इथून भाजपनं सहावेळा विजय मिळवला. भाजपनं यंदा चारसो पारचा नारा दिला आहे. ‘संविधान बदलण्यासाठी चारशे जागा हव्या आहेत,’ असं विधान करणाऱ्या खासदार हेगडेंचं तिकीट भाजपनं कापलंय.
अनंतकुमार हेगडे कर्नाटक भाजपमधील बडे नेते आहेत. १९९६ ते १९९६ अशी तीन वर्षे आणि मग २००४ ते २०२४ अशी २० वर्षे ते खासदार राहिले आहेत. त्यांच्यामुळेच भाजपला कारवारमध्ये पहिल्यांदा यश मिळालं. मागील चार निवडणुका जिंकणारे, २०१९ मध्ये प्रतिस्पर्धी उमेदवाराला तब्बल पावणे पाच लाख मतांनी धूळ चारणारे हेगडे संविधानाबद्दलच्या विधानामुळे वादात अडकले. त्यांच्या विधानामुळे पक्ष देशपातळीवर अडचणीत आला. त्यामुळे भाजपनं त्यांचं तिकीट कापल्याची चर्चा आहे.

गेल्या निवडणुकीत तब्बल ६८ टक्के मतं घेणाऱ्या हेगडेंच्या जागी भाजपनं यंदा विश्वेश्वर हेगडे-कागेरींना संधी दिली आहे. विश्वेश्वर हेगडे सिरसी विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाले होते. आता भाजपनं त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे. त्यांच्यासमोर काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर यांचं आव्हान असेल. विशेष म्हणजे निंबाळकरही विश्वेश्वर हेगडे यांच्याप्रमाणेच सिरसी विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाल्या होत्या. हा मतदारसंघ कारवार आणि बेळगाव जिल्ह्यात पसरलेला आहे. त्यात विधानसभेच्या ८ जागा येतात.