‘नाच गं घुमा’ आणि ‘जुनं फर्निचर’मध्ये जोरदार स्पर्धा , या सिनेमाची तीन कोटींहून अधिक कमाई

मुंबई: गेल्या दोन-तीन वर्षांत प्रदर्शित झालेल्या मराठी सिनेमांवर नजर टाकली तर लक्षात येईल की, प्रयोगशील आणि प्रेक्षकांना आकर्षित करणारे विषय पडद्यावर मांडले गेले. ‘हाऊसफुल्ल’च्या निमित्तानं मराठी सिनेमांना प्रेक्षकांचा कौलही कळतोय. त्यातही स्त्रीप्रधान सिनेमांना विशेष पसंती मिळतेय. सध्या बॉक्स ऑफिसवर तीन मराठी सिनेमांची चर्चा आहे. ‘जुनं फर्निचर’, ‘नाच गं घुमा’ आणि ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हे तीन सिनेमे सध्या बॉक्स ऑफिसवर आहेत. या तिनही सिनेमांनी आतापर्यंत चांगली कमाई केली आहे.

बॉक्स ऑफिसचं चित्र पाहता बॉलिवूड सिनेमांपेक्षा मराठी सिनेमांना प्रेक्षकपसंती मिळतेय. ‘जुनं फर्निचर’, ‘नाच गं घुमा’, ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’, या सिनेमांचे शो हाऊसफुल्ल असल्याचं पाहायला मिळतंय.

कमाई किती?

‘नाच गं घुमा’ सिनेमाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर, सिनेमानं आतापर्यंत ३.९० कोटींची कमाई केली आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषामागं एक बाई असते, आणि प्रत्येक यशस्वी बाईमागे एक कामवाली बाई असते… असं कामवाली बाईच्या अवती भवाती फिरणारं या सिनेमाचं कथानक आहे.

तर महेश मांजरेकर यांच्या जुनं फर्निचर या सिनेमानं सात दिवसांत ३.९७ कोटींचा गल्ला जमवला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे सिनेमा आहे. महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ या सिनेमाला प्रेक्षक गर्दी करताना दिसताय.

तर sacnilk या वेबसाइट नुसार ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या सिनेमानं आतापर्यंत ६० लाखांच्या जवळपास कमाई केल्याचं आकडे सांगत आहेत.

फक्त मुंबईमध्ये गेल्या २४ तासात ६० हजारांहून अधिक मराठी सिनेमांची तिकीटविक्री झाली आहे.
– ठाणे, मुंबई, नवी मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, नागपूर या केंद्रांवर ‘नाच गं घुमा’ सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

– मुंबईत लालबाग, दादर, माटुंगा आणि ठाणे, डोंबिवली, नवी मुंबईत ‘जुनं फर्निचर’ या सिनेमाचे बहुतांश शो हाऊसफुल्ल आहेत.

– पुण्यातील सिनेमागृहात ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ सिनेमाचे सूर घुमत आहेत.

– गेल्या महिन्याभरात मराठी चित्रपटांनी साधारण ९.९१ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Source link

juna furniture storymarathi movie box office collectionnaach ga ghumanaach ga ghuma castnaach ga ghuma office collection
Comments (0)
Add Comment