पुंछ: जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे एअर फोर्सच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात अनेक जवान जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे. या हल्ल्यानंतर स्थानिक राष्ट्रीय रायफल्स युनिटने परिसराला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली आहे. शाहसीतार जवळील जनरल परिसरात हवाई तळाच्या आत वाहने सुरक्षित करण्यात आल्याचे सुरक्षा दलातील अधिकाऱ्याने सांगितले. (बातमी अपडेट होत आहे)
सुरक्षा अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर गोळीबार केला. हा हल्ला सुरनकोटच्या सनाई गावात झाला. या परिसरात भारतीय लष्कर आणि पोलिसांची अतिरिक्त तुकडी पाठवली आहे.