Kirit Somaiya: मुश्रीफांचा १५०० कोटींचा तिसरा घोटाळा!; सोमय्यांचा आरोप, फिर्यादही दिली

हायलाइट्स:

  • हसन मुश्रीफांचा पंधराशे कोटींचा तिसरा घोटाळा!
  • किरीट सोमय्या यांचा पत्रकार परिषदेत आरोप.
  • कागलच्या मुरगूड पोलीस ठाण्यात दिली फिर्याद.

कोल्हापूर: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी जावयाच्या मदतीने पंधराशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी कोल्हापुरात केला. दरम्यान, राज्यात शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोटाळे करण्याची कला विकसीत केल्याचा आरोप करत पुन्हा एकदा या दोन नेत्यांना त्यांनी लक्ष्य केले. ( Hasan Mushrif Vs Kirit Somaiya Latest News )

वाचा: सोमय्यांचं पुढचं टार्गेट जरंडेश्वर कारखाना; ठाकरे सरकार व पवारांना दिलं आव्हान

सोमय्या यांनी मंगळवारी कोल्हापूर दौरा केला. राष्ट्रवादी पक्षाने त्यांच्या दौऱ्याकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका घेतल्याने या दौऱ्यात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सकाळी सोमय्या यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर कागल तालुक्यातील मुरगूड येथील पोलीस ठाण्यात त्यांनी मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या घोटाळ्याची फिर्याद दिली. प्रचंड पोलीस बंदोबस्तात त्यांचा हा दौरा झाला. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर सोमय्या यांनी हल्लाबोल केला. ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांचा तिसरा घोटाळा आपण उघडकीस आणल्याचे सांगून ते म्हणाले, ‘केंद्राकडून मिळणारा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यात जमा होतो. या निधीमध्ये मुश्रीफ यांनी जावयासोबत पंधराशे कोटींचा घोटाळा केला आहे. कंपनी अस्तित्वात नसताना या कंपनीला ठेका देण्यात आला. जावई मतीन मंगोली यांच्या बेनामी कंपनीला दादागिरीने ठेका दिला. बेनामी, बंद असलेल्या आणि अस्तित्वात नसलेल्या कंपन्यांच्या माध्यमातून त्यांनी घोटाळे केले आहेत. यश, अष्टविनायक, ब्रिक्स इंडिया आणि इतर काही कंपन्यांचा यासाठी वापर केला आहे. या घोटाळ्याबाबत ईडी कडे तक्रार दिली आहे. उद्या आयकर आणि सीबीआयकडेही तक्रार देणार आहे.’

वाचा:‘येत्या चार महिन्यांत महाराष्ट्राचे अर्धे मंत्रिमंडळ दवाखान्यात असेल’

‘भ्रष्टाचाराची ही कला मुख्यमंत्री ठाकरे व शरद पवार यांनी दाखविली. त्यातून अनेकांनी घोटाळे केले. आतापर्यंत मी २२ घोटाळे उघडकीस आणले. त्या सर्वांची चौकशी सुरू आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील आणखी दोन मंत्र्यांचे घोटाळे बाहेर पडतील. यामुळे येत्या चार महिन्यात अर्धे मंत्रिमंडळ गायब होईल, नाही तर दवाखान्यात असेल’, असा इशारा सोमय्या यांनी दिला. महाराष्ट हा सध्या भ्रष्टाचारयुक्त झाला आहे. महाविकास आघाडीने ही अवस्था केली आहे. हे राज्य भ्रष्टाचारमुक्त व्हावे यासाठी आम्ही विडा उचलला आहे. त्यासाठी आमचा लढा सुरू आहे. यासाठी अंबाबाईने ताकद दयावी असे साकडे घातल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचा:मुख्यमंत्र्यांपुढं आमचं काही चालत नाही!; अजित पवारांचं मोठं विधान

सीए बाबत तक्रार करणार

सोमय्या यांची सी. ए. ची पदवी संशयास्पद असल्याचा आरोप मुश्रीफ यांनी केला होता. याबाबत बोलताना ते म्हणाले, मी नुसता सी. ए. पास झालो नाही. राष्ट्रीय पातळीवरील यादीत चमकलो आहे. फायनान्स मध्ये पीएच. डी पदवी घेतली आहे. यामुळे माझ्या विरोधात आरोप केल्याबद्दल इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट या संस्थेकडे तक्रार करणार आहे.

वाचा: अनिल परबांनी आत्ताच्या पक्षप्रमुखांची शपथ घेतली असती तर…; भाजप नेत्याचा टोला

Source link

hasan mushrif vs kirit somaiyahasan mushrif vs kirit somaiya latest newskirit somaiya in kolhapurkirit somaiya in kolhapur updateskirit somaiya latest breaking newsउद्धव ठाकरेकिरीट सोमय्यामतीन मंगोलीशरद पवारहसन मुश्रीफ
Comments (0)
Add Comment