खासदार प्रज्वलविरोधात ‘ब्लू कॉर्नर नोटीस’? सीबीआयची सिद्धरामय्या यांना माहिती

वृत्तसंस्था, बेंगळुरू : अनेक महिलांच्या लैंगिक शोषणाचा आरोप असलेले कर्नाटकातील विद्यमान खासदार प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आता सीबीआय या प्रकरणातील पुढील तपासासाठी ब्लू कॉर्नर नोटीस काढणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना तपास यंत्रणेकडून शनिवारी ही माहिती देण्यात आली. याच प्रकरणात सिद्धरामय्या यांनी विशेष तपास पथकाची बैठक घेत प्रज्वल यांना अटक करण्यासाठी तातडीने पावले टाकण्याची सूचना केली.

‘प्रज्वल यांच्या अटकेसाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सीबीआय ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्याची शक्यता असून त्यामुळे तपासाला वेग येईल’, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आले. एखाद्या गुन्ह्याशी संबंधित व्यक्तीची ओळख, स्थान किंवा घटना समजून घेण्यासाठी त्या देशाकडून अतिरिक्त माहिती संकलित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पोलिस सहकार्य यंत्रणेकडून ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली जाते. तपास पथकाने भारतातील इंटरपोल प्रकरणांसाठी मुख्य माध्यम असलेल्या सीबीआयला प्रज्वल रेवण्ंणाविरुद्ध ब्लू कॉर्नर नोटीस पाठवण्याची विनंती केली आहे. ‘आम्ही आरोपीला अटक करून परत आणू’, असा विश्वास तपास पथकाने व्यक्त केला आहे.

लूकआऊट नोटीस जारी

बेंगळुरू : प्रज्वल यांच्यासह लैंगिक शोषणाचे आरोप असलेले होलेनरसीपूरचे आमदार एच. डी. रेवण्णा यांच्याविरुद्ध विशेष तपास पथकाने (एसआयटी) लूकआउट नोटीस जारी केली आहे. त्यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखलकरण्यात आले आहेत. रेवण्णा यांना या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकासमोर चौकशीसाठी हजर होण्यासाठी दुसरे समन्स बजावण्यात आले असून शनिवारी संध्याकाळपर्यंत वेळ आहे, असे कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी शनिवारी सांगितले. ‘रेवण्णांविरोधात आधीच लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. ते परदेशात जाण्याचा विचार करू शकतात, हा अंदाज असल्याने हे पाऊल टाकले आहे’, असे ते म्हणाले. त्यांचा मुलगा आणि आरोपी प्रज्वल यापूर्वीच परदेशात गेले आहेत. त्यांच्याविरोधात यापूर्वी अशीच लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे.

‘पीडितांना साह्य करा’

‘लैंगिक शोषण झालेल्या पीडित महिलांना सर्व प्रकारे आधार देऊन साह्य करा’, अशी विनंती काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सिद्धरामय्यांना केली आहे. तसेच या अत्यंत भीषण गुन्ह्याीतल सर्व दोषी आरोंना शिक्षा होण्यासाठी सर्व ते प्रयत्न करा, असेही ते म्हणाले. प्रज्वल यांनी अन्याय केलेल्या, बलात्कारपीडितांचे रक्षण करण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे, असे ते म्हणाले.
गुन्हेगारांनाही संरक्षणाची मोदीहमी आहे का? प्रज्वल प्रकरणी राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
‘आरोपांबद्दल माहिती नाही’

रेवण्णा यांच्यावरील लैंगिक शोषणाच्या आरोपांबद्दल माहिती असल्याचा दावा कर्नाटक भाजपचे अध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी शनिवारी फेटाळला. या मुद्द्याचा आगामी लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांवर कोणताही विपरित परिणाम होणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. आरोपांबाबत अद्याप कोणतेही पत्र मिळालेले नाही, असे ते म्हणाले.

Source link

CBI Blur corner noticecbi investigationkarnataka chief minister siddaramaiahkarnataka govtkarnataka mp prajwal revannaprajwal revanna obscene video casesexual harassment
Comments (0)
Add Comment