ओडिशाच्या निवडणूक रिंगणात ३७ उमेदवार, काही कोट्यधीश, तर काही गरीब; कोणाकडे किती संपत्ती?

वृत्तसंस्था, भुवनेश्वर : ओडिशातील लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या चार जागांसाठी १३ मे रोजी होणाऱ्या निवडणूक रिंगणातील ३७ पैकी १७ उमेदवार कोट्यधीश आहेत, असे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. नबरंगपूर, बेरहामपूर, कोरापुट आणि कालाहंडी लोकसभा मतदारसंघांसाठी रिंगणात एकूण ३७ उमेदवार असून, त्यापैकी १७ (४६ टक्के) उमेदवारांनी एक कोटी रुपयांपेक्षा अधिक संपत्ती असल्याचे जाहीर केले आहे, असे ‘एडीआर’च्या अहवालात म्हटले आहे.

सर्वात श्रीमंत उमेदवार

कालाहंडी मतदारसंघातील भाजप उमेदवार मालविका देवी यांची ४१.८९ कोटींची संपत्ती असून, त्या सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. बेरहामपूर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार व्ही. चंद्रशेखर यांची २८.७० कोटी आणि भारतीय विकास परिषदेचे बेरहामपूरचे उमेदवार राजेंद्र दलाबेहरा यांची १०.३० कोटींची संपत्ती आहे.

सर्वात गरीब उमेदवार

कोरापुट येथील एसयूसीआय (सी) पक्षाच्या उमेदवार प्रमिला पुजारी या सर्वात गरीब उमेदवार आहेत. त्यांच्याकडे केवळ २० हजार ६२५ रुपयांची संपत्ती आहे. बेरहामपूर येथील भाजप उमेदवार प्रदीप कुमार पाणिग्रही यांच्याकडे सर्वाधिक ३.८२ कोटींची संपत्ती आहे.

– उमेदवारांपैकी दहा म्हणजे २७ टक्के जणांचे वय २५ ते ४० वर्षादरम्यान
– २३ जण म्हणजे ६२ टक्के उमेदवार ४१ ते ६० वयोगटातील
– चार जणांचे (११ टक्के) वय ६१ ते ७० वर्षादरम्यान
– सात (१९ टक्के) उमेदवारांचे त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटले प्रलंबित
– उमेदवारांपैकी १४ म्हणजे ३८ टक्के जणांची शैक्षणिक पात्रता पाचवी ते बारावी उत्तीर्ण
– २२ म्हणजे ५९ टक्के उमेदवार पदवीधर, तर एका उमेदवाराने स्वतःला केवळ साक्षर असल्याचे जाहीर
– चौथ्या टप्प्यातील एकूण ३७ पैकी सात उमेदवार महिला
लाखोंचा बॅंक बॅलन्स, सोने-चांदी, ५ वर्षांत दुप्पट झाली संपत्ती, कोट्यधीश भारती पवारांची एकूण संपत्ती किती?
उमेदवारांचा लेखाजोखा

पक्ष————-कोट्यधीश उमेदवार
भाजप——————–४
बीजेडी——————–४
काँग्रेस——————–३
अपक्ष——————–४
भारतीय विकास परिषद——-१
नबा भारत निर्माण सेवा पक्ष—-१
एकूण———————१७

Source link

BJDbjpCongresslok sabha elections 2024odisha lok sabha candidates wealthodisha lok sabha elections
Comments (0)
Add Comment