२ सिम कार्ड बाळगणं महागणार
जर तुम्ही फोनमध्ये दोन सिम कार्ड वापरत असाल तर तुमच्या अडचणीत वाढ होऊ शकते. कारण दुसरं सिम अॅक्टिव्हेट ठेवण्यासाठी जास्त खर्च करावा लागू शकतो. सध्या जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया सिम अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी कमीत कमी १५० रुपयांचा रिचार्ज करावा लागतो. परंतु टॅरिफ वाढल्यानंतर सिम अॅक्टिव्हेट ठेवण्यासाठी १५० रुपयांच्या ऐवजी १८० ते २०० रुपयांपर्यंत बेस प्लॅन जाऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही दोन सिम वापरत असाल तर तुम्हाला कमीत कमी ४०० रुपयांचा मंथली म्हणजे २८ दिवसांचा रिचार्ज करावा लागेल.
किती दरवाढ होऊ शकते?
जर तुम्ही मंथली ३०० रुपयांचा रिचार्ज करत असाल तर टॅरिफमध्ये वाढ केल्यावर प्रत्येक महिन्याला सुमारे ७५ रुपये जास्त द्यावे लागू शकतात. तसेच ५०० रुपयांचा मंथली रिचार्ज दरवाढीनंतर १२५ रुपयांनी महाग म्हणजे ६२५ रुपयांचा होऊ शकतो.
५जी प्लॅन देखील होऊ शकतात लाँच
रिलायन्स जिओ आणि एअरटेल लवकरच 5G रिचार्ज प्लॅन लाँच करू शकतात, त्यामुळे आतापर्यंत मिळणाऱ्या फ्री सेवेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जर तुमच्याकडे एक सिम 5G आणि एक सिम 4G असेल तर तुमचा मासिक खर्च ५० टक्क्यांनी वाढू शकतो, कारण 5G प्लॅनची किंमत 4G च्या तुलनेत जास्त असेल. तसेच 4G प्लॅनच्या किंमतीत देखील वाढ केली जाऊ शकते. याआधी देखील बातम्या आल्या होत्या की लोकसभा निवडणुकीनंतर टेलिकॉम कंपन्या दरवाढ करू शकतात.