मी कमळाला मत देणार! ऐकताच काँग्रेस नेता संतापला; वृद्धेवर हात उगारला, पाहा VIDEO

हैदराबाद: तेलंगणाच्या नाजामाबादचे काँग्रेसचे खासदार जीवन रेड्डी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते एका शेतकरी महिलेच्या कानशीलात लगावताना दिसत आहेत. व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओवर तिच्या प्रश्नाला उत्तर देताना, ज्यामध्ये ते एका महिलेच्या कानशीलात लगावताना दिसत होते, निजामाबादमधील काँग्रेसचे खासदार जीवन रेड्डी म्हणाले, “हे प्रेम होते, ते प्रेम होते, ते प्रेम होते.” तेलंगणामध्ये १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

का उगारला हात?

ज्या महिलेवर जीवन रेड्डी यांनी हात उगारला त्या महिलेने भाजपला मत देणार असं म्हटलं होतं, असं सांगितलं जात आहे. हे ऐकताच रेड्डी संतापले आणि त्यांनी थेट त्या वृद्ध महिलेच्या कानशीलात लगावली. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर लोक संताप व्यक्त करत आहेत.

तेलंगणा येथे १३ मे ला चौथ्या टप्प्याचं मतदान होणार आहे. यासाठी निजामाबाद मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार जीवन रेड्डी शुक्रवारी आरमूर येथील एका गावात प्रचारासाठी पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत आरमूर येथून विधानसभेत पराभूत झालेले काँग्रेस उमेदवार विनय कुमार रेड्डी हे देखील होते.

यादरम्यान त्यांनी काही मजूरांची भेट घेतली. यादरम्यान जीवन रेड्डी आणि कुमार रेड्डी हे या वृद्ध महिलेला भेटले. यावेळी महिलेने फूल या निशाणीवर म्हणजेच कमळावर मत देणार असं सांगितलं. हे ऐकताच जीवन रेड्डी यांनी महिलेच्या कानशीलात लगावली आणि त्यानंतर ते जोरात हसू लागले.

टाइम्सच्या या रिपोर्टनुसार, व्हिडिओमध्ये जी वृद्ध महिला दिसत आहे तिने विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसलाच मत दिलं होतं. पण, महिला काँग्रेसवर नाराज होती की तिला नाही घर मिळालं नाही पेन्शन मिळाली. त्यामुळे तिने भाजपला मत देणार असं म्हटलं होतं.

Source link

Congress candidate jeevan reddycongress candidate slap womancongress leaderLok Sabha electionsloksabha election 2024Nizamabad Lok Sabha constituencytelangana video viralकाँग्रेस उमेदवार जीवन रेड्डीजीवन रेड्डीने महिलेवर हात उगारलातेलंगाणा लोकसभा निवडणूकलोकसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment