आधी पत्नीला लाईव्ह लोकेशन पाठवलं, मग डिलीट; टाटा स्टीलच्या नॅशनल बिझनेस हेडचा खून, गूढ कायम

गाझियाबाद: उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील शालिमार गार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाटा स्टीलचे नॅशनल बिझनेस हेड विनय त्यागी यांच्या हत्येचं गूढ अद्याप उकललेलं नाही. विनय यांनी गेल्या शुक्रवारी पत्नीला लाईव्ह लोकेशन पाठवलं होतं. पण त्यानंतर त्यांनी ते डिलीट केलं. लाईव्ह लोकेशन विनय यांनी डिलीट केलं होतं की त्यांची हत्या केल्यानंतर मारेकऱ्यांनी ते डिलीट केलं, याचा तपास पोलीस करत आहेत.

विनय त्यागी शुक्रवारी रात्री ८ वाजून २७ मिनिटांनी राजबाग मेट्रो स्टेशनवर एकटे उभे असलेले दिसले. त्यानंतर रात्री ११ वाजून २१ मिनिटांनी त्यांनी पत्नीला कॉल केला आणि लोकेशन पाठवून घरी जाण्यासाठी पिक करण्यास सांगितलं. पण थोड्या वेळात त्यांनी पुन्हा कॉल केला आणि आपणच घर येऊ, पिक करण्याची गरज नसल्याचं सांगितलं. पण त्यानंतर बराच वेळ उलटूनही ते घरी पोहोचले नाहीत.
बँक खात्यात ११ रुपये असलेले ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; ठाकरेंच्या शिलेदाराची अडचण
विनय त्यागी यांच्या कुटुंबानं त्यांचा शोध सुरु केला. तेव्हा विनय जखमी अवस्थेत एका नाल्यात सापडले. कुटुंबियांनी त्यांना घेऊन रुग्णालय गाठलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. विनय यांचं कोणाचंही शत्रुत्व नव्हतं, असं त्यांचे वडील विश्वंभर त्यागींनी सांगितलं. विनय यांची हत्या व्यवस्थित कट रचून करण्यात आल्याचं ते म्हणाले. विनय यांचा मोबाईल, लॅपटॉप, पाकीट गायब होतं याकडेही त्यांना लक्ष वेधलं. विनय यांच्या पाकिटात बऱ्याचदा बरीच रोख रक्कम असायची. पण केवळ लूटमारीच्या हेतूनं विनय यांची हत्या झालेली नसावी असा संशय त्यांच्या कुटुंबियांनी बोलून दाखवला.

अतिशय सुनियोजितपणे विनय त्यागींची हत्या केल्याचा दावा कुटुंबानं केला आहे. ट्रांस हिंडनचे डीसीपी निमिष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांची ८ पथकं हत्या प्रकरणाचा तपास करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासली जात आहेत. त्यात काही संशयित बाईकस्वार विनय यांच्या आसपास दिसत आहेत. विनय त्यागी यांच्यावर चाकूनं अनेक वार करण्यात आले. यातील काही वार त्यांच्या छातीवर करण्यात आले. अंतर्गत रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाल्यानं विनय यांचा मृत्यू झाला. विनय त्यागी यांनी त्यांच्या पत्नीला व्हॉट्सवर लाईव्ह लोकेशन पाठवलं होतं. ते त्यांनी डिलीट का केलं, याचा तपास पोलिसांकडून सुरु आहे.

Source link

murdertata steeltata steel business head stabbedटाटा स्टीलटाटा स्टील बिझनेस हेडची हत्याव्हॉट्स ऍप चॅटहत्या
Comments (0)
Add Comment