Explainer: डाव्या चळवळीतील विद्यार्थी नेते काँग्रेसमध्ये का जाताहेत?

अहमदनगर: सीपीआयमधून बाहेर पडलेले विद्यार्थी नेते () आणि गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवाणी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या भूमिकेवर दोन्ही बाजूंनी प्रतिक्रिया उमटत आहेत. डाव्या चळवळीतील काही तरुण कार्यकर्त्यांनी कन्हैया कुमारच्या भूमिकेचे स्वागत केले असून यासाठी डाव्या पक्षांच्या नेतृत्वाला जबाबदार धरले आहे. कन्हैया कुमार काँग्रेसमध्ये जाणारे पहिलेच डावे विद्यार्थी नेते नाहीत, आतापर्यंत सात विद्यार्थी नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यातील चौघे जेएनयू स्टुडंट युनियनचे प्रेसिडेंट होते, असेही याच्या समर्थनार्थ सांगितले जात आहे.


श्रीरामपूर येथील तरुण राजकीय अभ्यासक धनंजय कानगुडे यांनीही या भूमिकेला समर्थन देणारे मत व्यक्त करून डाव्या चळववळीतील विद्यार्थी नेत्यांना काँग्रेसमध्ये का जावे वाटते, याचे डाव्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे, असेही कानगुडे यांनी म्हटले आहे. त्यांनी म्हटले आहे, काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे कन्हैया कुमार पहिले डावे विद्यार्थी नेते नाहीत. यापूर्वी एसएफआयमधून जेएनयू स्टुडंट युनियनचे प्रेसिडेंट झालेल्या चार व आइसामधून प्रेसिडेंट झालेल्या दोन नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे कन्हैया कुमार सातवे डावे जेएनयू प्रेसिडेंट आहेत. पहिले डी. पी. त्रिपाठी १९७५ ते १९७७ या काळात प्रेसिडेंट होते. तेव्हापासून जेएनयूचे सात डावे विद्यार्थी नेते काँग्रेसमध्ये गेले. डावे पक्ष आपल्या सर्वोच्च विद्यार्थी नेत्यांमध्ये ‘डावेच बदल घडवण्यासाठी सक्षम आहेत’, असा विश्वास निर्माण करण्यात कमी पडले. हे विद्यार्थी नेते बराच काळ डाव्या पक्षात होते. तेव्हा पक्षाने त्यांना नेमके काय आणि कसे प्रशिक्षण दिले की त्यांना आता पक्षावरच विश्वास राहिलेला नाही? सध्याच्या फॅसिस्ट शक्तींना डावेच पुरून उरतील, असा विश्वास या तरुणांना का वाटत नसावा? तो निर्माण करण्यात नेतृत्व कमी पडले हे कधी मान्य करणार आहोत आपण? सगळा दोष तरुणांचाच आहे का? नेतृत्वाने काय तीर मारला आहे? असे प्रश्न कानगुडे यांनी उपस्थित केले आहेत.
कन्हैया कुमार यांच्या काँग्रेस प्रवेशानंतर डाव्या पक्षांमध्येही मंथन सुरू झाल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे त्यांच्या काँग्रेस प्रवेशाचे काँग्रेसमध्येही संमिश्र स्वागत होत आहे.

Source link

Communist Party of IndiaCongresskanhaiya kumarKanhaiya Kumar Joins CongressKanhaiya Kumar-Congress and Left MovementRahul Gandhiकन्हैया कुमारभारतीय कम्युनिस्ट पक्ष
Comments (0)
Add Comment