अरविंद केजरीवाल आणखी अडचणीत; ED, CBIनंतर आता NIAचा बॉम्ब! दहशतवादी संघटनेकडून निधी घेतल्याप्रकरणी होणार चौकशी

नवी दिल्ली: दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. गेल्या दीड महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या केजरीवाल यांच्यावर ईडी आणि सीबीआयनंतर आता राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात NIAकडून चौकशी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या संदर्भात उपराज्यपालांनी गृहमंत्रालयाला पत्र पाठवले आहे. या पत्रात केजरीवाल यांच्यावर दहशतवादी संघटना शिख फॉर जस्टिस कडून निधी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

केजरीवाल यांनी १६ मिलियन अमेरिकन डॉलर घेतल्याचा आरोप करत दिल्लीचे उपराज्यपाल व्ही के सस्केना यांनी एनआयएकडून चौकशी करण्याची शिफारस केली आहे. दरम्यान आम आदमी पक्षाने हा एक कट असल्याचा आरोप केलाय.

विश्व हिंदू महासंघाकडून उपराज्यपाल सक्सेना यांना एक तक्रार मिळाली होती. ज्यात केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालीली ‘आप’ने देवेंद्र पाल भुल्लरच्या सुटकेसाठी आणि खलिस्तान समर्थकांना पाठिंबा देण्यासाठी कट्टरपंथियांकडून १६ मिलियन अमेरिकन डॉलर घेतल्याचा आरोप करण्यात आला होता.

उपराज्यपाल सक्सेना यांना पत्र मिळाल्यानंतर त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे एनआयएकडून चौकशीची शिफारस केली आहे. तक्रार एका मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केली आहे आणि बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेकडून निधी मिळाल्याचा आरोप करण्यात आल्याने याप्रकरणी चौकशीची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे सस्केना यांनी ही शिफारस करताना जानेवारी २०१४ मध्ये केजरीवाल यांनी इकबाल सिंह यांना लिहलेल्या पत्राचा संदर्भ दिला आहे. या पत्रात आप सरकारने राष्ट्रपतींकडे भुल्लरच्या सुटकेची शिफारस केली होती.

विश्व हिंदू महासंघाचे राष्ट्रीय महासचि आशू मोंगिया यांनी केलेल्या तक्रारीत केजरीवाल यांनी २०१४मध्ये न्यूयॉर्क येथील गुरुद्वारा येथे खलिस्तानी नेत्यांसोबत बंद खोलीत चर्चा केली होती. या बैठकीत आपला निधी देण्यासंदर्भात आश्वासन देण्यात आले होते. त्या बदल्यात देवेंदर पाल भुल्लर यांच्या सुटकेचे आश्वासन करण्यात आल्याचे म्हटले गेले आहे. हे आरोप करताना मोंगिया यांनी खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंह पन्नूच्या एका व्हिडिओचा हवाला दिला आहे.

Source link

arvind kejriwalArvind Kejriwal NIA inquiryniaserious allegations against arvind kejriwalterrorist fundsअरविंद केजरीवालराष्ट्रीय तपास यंत्रणा
Comments (0)
Add Comment