इंस्टाग्रामवर अनेक फीचर्स असे आहेत ज्यांची माहिती बहुतांश युजर्सना नसते. खासकरून जर फीचर्स क्रिएटर्स आणि इन्फ्लूएंसारसाठी आलं असेल तर खूप कमी लोक याचा वापर करतात. आम्ही आज तुम्हाला इंस्टाग्रामच्या एका अश्याच फीचरची माहिती देणार आहोत ज्याचा क्रिएटर्स आणि इन्फ्लूएंसार लोकांना खूप फायदा होईल. इंस्टाग्रामचं नवीन नोटिफाय फीचर तुमच्या इंस्टाग्रामच्या ग्रोथसाठी खूप उपयुक्त ठरू शकतं. या फीचरमुळे तुम्ही जास्तीत जास्त अकाऊंट्स पर्यंत पोहचू शकाल.
Instagram च्या या फीचरमुळे वाढतील फॉलोअर्स
असा होऊ शकतो फायदा
Instagram च्या या फीचरमुळे वाढतील फॉलोअर्स
- हे फीचर वापरण्यासाठी तुम्हाला जास्त काही करावे लागणार नाही तर यासाठी जेव्हा एखादी रील पोस्ट कराल तेव्हा ती तुमच्या स्टोरीवर देखील शेयर करा.
- इथे वर दिलेल्या इमोजी आयकॉनवर क्लिक करा, तिथे तुम्हाला अनेक अस्फन दिसतील, यातील नोटिफायचा ऑप्शन सिलेक्ट करा. आणि स्टोरी पोस्ट करा.
- यामुळे तुमच्या सर्व फॉलोअर्सकडे नोटिफिकेशन जाईल जेव्हा तुम्ही नवीन स्टोरी, रील पोस्ट शेयर कराल. तुमचे फॉलोअर्स त्यावर क्लिक करतील तेव्हा थेट तुमच्या पोस्टवर पोहोचतील.
- अश्याप्रकारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत नोटिफकेशन पोहचेल आणि जास्त लोक तुमच्या प्रोफाईलवर विजीट करतील आणि तुम्हाला फॉलो करतील.
असा होऊ शकतो फायदा
इंस्टाग्रामवर सुमारे ३३ टक्के युजर्सची रिच चांगला नसल्याची तक्रार असते. अनेकांच्या व्हिडीओवर फक्त ३०० ते ४०० दरम्यान व्ह्यूज येतात. त्यामुळे जर व्ह्यूज मिळत नसतील तर अकॉऊंट वाढेल कसं, पुढे जाईल कसं. फॉलोवर्स वाढण्याची शक्यता देखील कमी होते. वरील फीचरच्या मदतीनं तुमचे जितके फॉलोअर्स असतील त्यांना नोटिफिकेशन जाईल. जेव्हा ते या नोटिफिकेशनवर क्लिक करतील तेव्हा तुमचे व्ह्यूज नक्कीच वाढतील.
परंतु लक्षात असू द्या की तुमच्या प्रोफाईलवर इनफॉर्मेटिव रील्स आणि पोस्ट शेयर करायला विसरू नका. इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट युजर्स पाहतात आणि त्यांना आवडतो देखील. जर तुमच्या कंटेंटची क्वॉलिटी चांगली असेल तर फॉलो करण्याची शक्यता देखील वाढते.