वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : मूळ भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स तब्बल तिसऱ्यांदा अंतराळात झेप घेणार आहेत. बोइंगचे स्टारलायनर हे अंतराळयान फ्लोरिडा येथील केप कॅनव्हेरल येथून आंतरराष्ट्रीय अंतराळ तळाच्या दिशेने अवकाशात झेपावणार असून त्यासाठी पायलट या नात्याने ५८ वर्षीय सुनीता यांची निवड झाली आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज, मंगळवारी सकाळी ८ वाजून ४ मिनिटांनी हे अंतराळयान सुनीता यांना घेऊन अवकाशात झेपावेल. त्यांच्यासोबत बूच विल्मर हे अंतराळवीरही असणार आहेत.‘या मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून आम्ही उड्डाणस्थळी दाखल झालो आहोत. या मोहिमेबाबत आम्ही आमच्या मित्रांशी व कुटुंबीयांशी बोललो. आम्ही या मोहिमेचा एक भाग असल्याचा त्यांना खूप आनंद झाला आहे व त्यांना आमचा अभिमान वाटतो,’ अशी प्रतिक्रिया सुनीता यांनी दिली. ही मोहीम यशस्वी झाल्यास अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ तळावर नेण्यात व तेथून परत आणण्यात यशस्वी होणारी बोइंग ही एलन मस्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीनंतरची दुसरी खासगी कंपनी ठरेल.
स्टारलायनरच्या या मोहिमेची २२ मार्च रोजी घोषणा करण्यात आली होती. या मोहिमेमुळे इतिहास घडणार आहे. आपण अंतराळ संशोधनाच्या सुवर्णयुगात आहोत, अशी प्रतिक्रिया नासाचे प्रशासक बिल नेल्सन यांनी त्यावेळी दिली होती.मागील अंतराळ यात्रेत सुनीता यांनी भगवद्गीता सोबत नेली होती. यावेळी त्या गणेशमूर्तीसोबत घेऊन जाणार आहे. कारण गणेश देवता त्यांच्यासाठी लकी आहे. असं त्यांनी सांगितलं.
जागतिक विक्रमाची नोंद

सुनीता यांना नासाने १९९८मध्ये अंतराळात जाण्याची प्रथम संधी दिली होती. यानंतर २००६मध्येही अन्य सहकाऱ्यांसोबत अंतराळ मोहिमेवर गेल्या होत्या. आपल्या पहिल्या मोहिमेत महिला अंतराळवीर या नात्याने अंतराळात चार टप्प्यांत मिळून सर्वाधिक काळ म्हणजे, २९ तास १७ मिनिटे स्पेसवॉक करण्याचा जागतिक विक्रम सुनीता यांनी आपल्या नावे केला होता. पेगी व्हिटसन यांनी २००८मध्ये हा विक्रम मोडला.