…अन्यथा कारवाईस तयार राहा! भाजप नेतृत्त्वाकडून नेते, पदाधिकाऱ्यांना इशारा; शहा ऍक्टिव्ह

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाल्यानं सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची चिंता वाढली आहे. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी भाजपनं आता ताकद पणाला लावली आहे. यासाठी केंद्रीय पातळीवरुन हालचाली सुरु झाल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यापासून मतदान टक्केवारी वाढवण्यासाठी भाजपनं नेत्यांना सूचना केल्या आहेत. कमी मतदान झाल्यास नेत्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. मग त्यांनी कारवाईसाठी तयार राहावं, असा थेट इशारा भाजप नेतृत्त्वाकडून देण्यात आला आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदानाची टक्केवारी कमी झाल्यानं भाजपची धाकधूक वाढली आहे. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत दुसऱ्या टप्प्यात अधिक मतदान झालं. पण भाजपच्या अंदाजानुसार तेही कमी आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वत: सक्रिय झाले आहेत. राज्यांचे प्रदेशाध्यक्ष, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी बोलून त्यांनी सूचना दिल्या आहेत. देशात आज तिसऱ्या टप्प्यातलं मतदान होतंय. त्यापूर्वी शहा यांनी लोकसभा प्रभारी, प्रदेश प्रभारी आणि संघटनांच्या नेत्यांना सर्व जागांवर मतदान वाढवण्याबद्दल सूचना दिल्या. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि सर्व राष्ट्रीय सरचिटणीसदेखील मतदानावर लक्ष ठेवून आहेत.
शांतीगिरी महाराज लढण्यावर ठाम, महायुतीला घाम; ३ मंत्री मनधरणीला, ४ जागा डेंजर झोनमध्ये
‘त्यांचं’ मतदान १०० टक्के झालंच पाहिजे
वाढत्या आणि कडक उन्हामुळे मतदान कमी होतं. पण प्रत्येक मतदान केंद्रावर पूर्वीपेक्षा ३७० मतं कशी पडतील, यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. केंद्रीय योजनांच्या सर्व लाभार्थ्यांचं १०० टक्के मतदान व्हायला हवं, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मोफत रेशन योजना असो वा प्रधानमंत्री आवास योजना, लाभार्थ्यांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी भाजपची टीम कामाला लागली आहे.

राज्यात बैठकांचा जोर, बावनकुळे सक्रिय
राज्यात आज ११ जागांसाठी मतदान होत आहे. मतदानाचा टक्का कोणत्याही परिस्थितीत वाढवा, असं निर्देश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल ११ बैठक घेतल्या. एका मतदारसंघातील १ हजार बूथप्रमुख, शक्ती केंद्रप्रमुख आणि सुपर वॉरियर ऑनलाईन बैठकांनी उपस्थित होते. महाविजय २०२४ चं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोठ्या प्रमाणात झालंच पाहिजे. त्यात कोणतीही कसर सोडू नका, अशा सूचना वरिष्ठ पातळीवरुन करण्यात आल्या आहेत.

Source link

amit shahbjplok sabha election 2024votingअमित शहाभाजपमतदानलोकसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment