Xiaomi नं Mijia 3 HP ड्युअल आउटलेट व्हर्टिकल एअर कंडीशनर चीनमध्ये ५,७९९ युआन (सुमारे ६८,४०० रुपये) च्या किंमतीत सादर केला आहे आणि हा प्री-सेलसाठी उपलब्ध आहे. सध्या हा एसी फक्त चीनमध्ये उपलब्ध आहे, भारतासह जागतिक बाजारात याची एंट्री होण्याची शक्यता थोडी कमी आहे.
एअर कंडीशनर १७१० m³/h हवा फेकतो, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेत हा एसी १९३० वॉट क्षमतेसह कुलिंग देतो तर २६८०वॉट क्षमतेसह हीटिंग देऊ शकतो. एअर कंडीशनर मध्ये हाय डेंसिटी अँटीबॅक्टीरियल आणि अँटीफंगल फिल्टर मिळतात, जे खोलीतील हवा स्वच्छ करतात. हे फिल्टर ९९% पर्यंतचे बॅक्टरीया मारू फिल्टर करू शकतात असा दावा कंपनीनं केला आहे.
हा १६०-डिग्री अल्ट्रा-वाइड अँगलवर एक सामान हवा फेकतो. फर्स्ट-लेव्हल एनर्जी एफिशिएंसी रेटिंगसह पर्यावरणपूरक देखील आहे. कंपनीचा दावा आहे की नवीन एअर कंडीशनर ४२-४६ डीबी (ए) नॉइजसह अत्यंत कमी आवाज करतो. यात सेल्फ-क्लीनिंग टेक्नॉलॉजी देखील आहे, त्यामुळे मेंटेनन्ससाठी देखील ग्राहकांना जास्त त्रास घ्यावा लागत नाही.
कंपनीनं यात Xiaomi हायपरओएस कनेक्टची सुविधा दिली आहे, जी स्मार्ट इंटरकनेक्शन बनवते. युजर्स Mijia अॅपच्या माध्यमातून एअर कंडीशनर दुरून कंट्रोल करू शकतात. यात व्हॉइस कंट्रोलचा देखील समावेश आहे.