चिपी विमानतळ उद्घाटन: निमंत्रण पत्रिकेत नारायण राणेंचे नाव कितव्या क्रमांकावर?

हायलाइट्स:

  • चिपी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याची तयारी पूर्ण
  • सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती
  • निमंत्रण पत्रिकेत उद्धव ठाकरे यांचे नाव पहिल्या क्रमांकावर

मुंबई: सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाचं (Chipi Airport Inauguration) येत्या ९ ऑक्टोबर रोजी होत आहे. केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) व केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे दोन्ही नेते या निमित्तानं एकाच व्यासपीठावर येणार आहेत. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरील नावांची माहिती दिली आहे.

चिपी विमानतळाच्या उद्घाटनाआधीच शिवसेना व भाजपमध्ये श्रेयाची लढाई सुरू आहे. चिपी विमानतळासाठी शिवसेनेनं संसदेत अनेकदा पाठपुरावा केल्याचं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. तर, आमच्या पाठपुराव्यामुळं व केंद्र सरकारच्या प्रयत्नांतूनच हे विमानतळ सुरू होत असल्याचा भाजपचा व नारायण राणे यांचा दावा आहे. विमानतळाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे असलेच पाहिजेत असं नाही. ते आले तर त्यांना प्रोटोकॉलनुसार मान देऊ, असं राणे यांनी काही दिवसांपूर्वी म्हट(Chipi Airport Inauguration)लं होतं. मात्र, भाजपनं सबुरीची भूमिका घेत त्यावर पडदा टाकला होता. आता प्रत्यक्ष कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका तयार झाली आहे. त्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव पहिल्या क्रमांकावर असून त्यांच्याच हस्ते विमानतळाचं उद्घाटन होणार आहे.

वाचा: ‘जाणत्या राजा’ला सहकार मंत्रालय सुरू करण्याचे का सुचले नाही?; पवारांवर निशाणा

उदय सामंत यांनी मटा फेसबुक लाइव्हमध्ये ही माहिती दिली. ‘निमंत्रण पत्रिकेत मुख्यमंत्री ठाकरे यांच्यानंतर केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचं नाव आहे. तिसऱ्या क्रमांकावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव आहे. प्रोटोकॉलप्रमाणे सर्वांची नाव आहेत. मुख्यमंत्री तिथं येणार आहेत. ज्यांची ज्यांची नावं आहेत, त्यांनी कार्यक्रमाला यावं अशी अपेक्षा आहे,’ असं उदय सामंत म्हणाले.

श्रेयवादाच्या मुद्द्यावरही उदय सामंत यांनी भाष्य केलं. ‘कोकणवासीयांचं आणि सिंधुदुर्गातील जनतेचं स्वप्न पूर्ण होतंय, याचा मला जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आनंद होतोय. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हावं लागलं, याचं समाधान आहे,’ असा चिमटाही सामंत यांनी काढला.

वाचा: डाव्या चळवळीतील विद्यार्थी नेते काँग्रेसमध्ये का जाताहेत?

Source link

chipi airport inaugurationNarayan RaneSindhudurgUday SamantUday Samant Facebook LiveUddhav Thackerayउदय सामंतउद्धव ठाकरेचिपी विमानतळनारायण राणे
Comments (0)
Add Comment