बॉक्स ऑफिसवर पुन्हा महिलाराज, ‘नाच गं घुमा’ची सहा दिवसांत बक्कळ कमाई, या सिनेमानं केली प्रेक्षकांची निराशा

मुंबई: गेल्या काही वर्षात मराठी असो किंवा बॉलिवूड… चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषय पाहायला मिळाले. पण यात स्त्रीप्रधान सिनेमांची संख्या मोठी आहे. हे स्त्रीप्रधान सिनेमा बॉक्स ऑफिसवर बाजी मारताना दिसत आहेत. यावर्षी देखील महिलाकेंद्री विषय असलेल्या सिनेमांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळतोय. त्यांचं आयुष्य, नातेसंबंध, त्यांची मतं, भूमिका, भावविश्व, त्यांच्यातली मैत्री, त्यांचं म्हणणं असं सारं काही त्या सिनेमांमधून दाखवलं जात आहे. या सिनेमे महिलावर्गाला आकर्षित करताना दिसत आहेत. हे चित्रपट कधी हसवतात, कधी रडवतात, तर कधी विचार करायला लावतात.

गेल्या वर्षी ‘बाईपण भारी देवा’ सिनेमानं तर इतिहास रचला. त्यानंतर आलेल्या झिम्मा २ सिनेमालाही चांगला प्रतिसाद मिळाला. तर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या नाच गं घुमा सिनेमालाही प्रेक्षकांचा, विशेषत: महिलावर्गाचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. महिलावर्ग नटून-थटून आपल्या मैत्रिणींसोबत सिनेमा पाहायला थिएटरमध्ये गर्दी करताना दिसत आहे.
बाबांसाठीच गाडी घेतली पण उशीर झाला…. वडिलांनी आपली कार न पाहिल्याची सल गौरव मोरेच्या मनात अजूनही

कमाई किती?
नाच गं घुमा या सिनेमाची निर्मिती स्वप्नील जोशी व शर्मिष्ठा राऊत यांनी केली आहे. सिनेमात मुक्ता बर्वे, सारंग साठ्ये, नम्रता संभेराव, सुप्रिया पाठारे, सुकन्या मोने व मायरा वायकुळ यांच्या भूमिका आहेत. या सिनेमानं सात सहा दिवसांत ८ कोटींच्या जवळपास कमाई केल्याचं sacnilk या वेब साइटवरचे आकडे सांगतात.

जोरदार प्रमोशन
सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरही सिनेमाची टीम देखील प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. सिनेमाची टीम वेगवेगळ्या शहरांत जात प्रेक्षकांच्या भेटी घेत आहे. त्यामुळं प्रेक्षकांनाही ही गोष्ट थिएटरमध्ये खेचण्यासाठी महत्त्वाची ठरतेय. त्यामुळं हे चित्र पाहता सिनेमाच्या कमाईत येत्या काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

‘जुनं फर्निचर’ची कमाई किती ?
तर महेश मांजरेकरांच्या ‘जुनं फर्निचर’ सिनेमाचीही बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई झाली आहे. सिनेमानं १२ दिवसांत ६ कोटींच्यावर कमाई केली आहे.

मात्र या दोन सिनेमांच्या तुलनेत ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ हा सिनेमा कमाईच्या तुलनेत काहीसा मागे पडल्याचं चित्र आहे.

Source link

box office collectionjuna furniture movie collectionnaach ga ghumanaach ga ghuma box office collectionswargandharva sudhir phadke movie box office collection
Comments (0)
Add Comment