उमर्दे येथे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी ३४हजार लांबवले..


(शैलेश चौधरी)

एरंडोल: तालुक्यातील उमर्दे येथे २९सप्टेंबर२०२१ रोजी रात्री पाऊस सूरू असल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्याने अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सुमनबाई विठ्ठल पाटील यांची २८हजार रू. रोकड व ६हजार रू. किमतीचे चांदीचे ब्रेसलेट लंपास केले.
सदरील ऐवज लोखंडी पेटीत ठेवलेला होता. ती पेटीच चोरट्यांकडून लांबविण्यात आली. याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एरंडोल पोलिस करीत आहेत.

Comments (0)
Add Comment