रणधीर गोलन, धर्मपाल गोंदर आणि सोमवीर सांगवान या तिघांनी सैनी सरकारचा पाठिंबा काढून घेतलाय.
हरियाणा विधानसभेची सदस्य संख्या ९० आहे. सरकार स्थापन करण्यासाठी ४६ आमदारांच्या पाठिंब्याची गरज आहे. मात्र सध्या विधानसभेच्या दोन जागा रिक्त असल्याने बहुमतासाठी ४५ आमदारांची गरज आहे. नंबरगेमचा विचार करता राज्यातील भाजप सरकार अल्पमतात आल्याचे दिसते. भाजपकडे ४० आमदार आहेत. त्यांना २ अपक्ष आणि हरियाणा लोकहित पार्टी (गोपाल कांडा)च्या एका आमदाराचा पाठिंबा आहे. सध्या सैनी सरकारसोबत ४३ आमदार आहेत.
विरोधकांकडे नजर टाकली तर काँग्रेसकडे ३०, आज सोबत आलेले ३ अपक्ष आमदार असे ३३चे बळ आहे. जेजेपीकडे १० आमदार आहेत. एक आमदार INLDचा आहे. या शिवाय आणखी एक अपक्ष आमदार आहे. राज्यात १२ मार्च रोजी नायब सिंह सैनी यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. सैनी यांच्या सरकराने आवाजी मतदानाने विश्वास दर्शक प्रस्ताव जिंकला होता. राज्यातील या घडामोडींवर भूपिंदर सिंह हुड्डा यांनी सैनी सरकार अल्पमतात आल्याचे म्हटले आहे.