मॅच्युअर होईपर्यंत राजकीय वारसदार नको, मायावती ‘आत्या’ने भाचे आकाश आनंद यांना पदावरुन हटवलं

लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या (बसप) सर्वेसर्वा मायावती यांनी आपल्या पक्षाच्या उत्तराधिकारी पदापासून आकाश आनंद यांना मंगळवारी दूर केले. आकाश आनंद हे मायावती यांचे भाचे आहेत. ‘पूर्ण परिपक्वता येईपर्यंत आकाश आनंद यांना राष्ट्रीय समन्वयक आणि उत्तराधिकारी पदापासून दूर ठेवले जात आहे’, असे मायावती यांनी आपल्या ‘एक्स’वरील संदेशात नमूद केले आहे.

मायावती यांनी आपल्या ‘एक्स’वरील संदेशात म्हटले आहे, की ‘बसप’ हा केवळ पक्ष नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आत्मसन्मान व स्वाभिमान तथा सामाजिक परिवर्तनाची चळवळ देखील आहे. यासाठी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष कांशीराम यांनी आपले आयुष्य समर्पित केले. यास गती देण्यासाठी नव्या पिढीला तयार केले जात आहे. यासाठीच आकाश आनंद यांना पक्षाने राष्ट्रीय समन्वयक आणि उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. मात्र, पक्ष आणि चळवळीच्या हितासाठी त्यांना या दोन्ही जबाबदाऱ्यांपासून वेगळे केले जात आहे.
मी रात्री वेशांतर केले नाही, फडणवीसांच्या ‘पडेल नाटका’च्या टीकेला अमोल कोल्हेंचा पलटवार
दरम्यान, मायावती यांचे बंधू व आकाश आनंद यांचे वडील आनंद कुमार हे पक्ष आणि चळवळीच्या कार्यात अगोदरपासून सक्रिय आहेत. ‘बसप’चे नेतृत्त्व पक्षाच्या हितासाठी आणि चळवळीसाठी त्याग करण्यास तयार आहे, असेही त्यांनी संदेशात म्हटले आहे.

हटविण्याचे कारण काय?

उत्तर प्रदेशातील सीतापूर पोलिस ठाण्यात आकाश आनंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. निवडणूक प्रचार रॅलीदरम्यान त्यांनी भाजप सरकारची तुलना थेट दहशतवाद्यांशी केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांनी गुन्हा केला होता. तसेच त्यांची प्रचार रॅलीची परवानगी देखील काढून घेतली होती.
शपथविधीत वळसेंचं नाव आलं अन् गडी बिथरला; हा काय एवढा मोठा नेता आहे? अजितदादांच्या अशोक पवारांना कानपिचक्या
– विजय महाले, प्रतिनिधी

Source link

Akash Anandlok sabha elections 2024MayawatiMayawati Bhatije AkashMayawati Nephewuttar pradeshआकाश आनंदउत्तर प्रदेशमायावतीलोकसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment