Google Pixel 8a ची किंमत
Google चा Pixel 8a ग्लोबल मार्केटमध्ये 128GB आणि 256GB स्टोरेज ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल. या दोन्ही स्टोरेज व्हेरिएंटमध्ये 8GB रॅम मिळतो. भारतात 128GB व्हेरिएंटची किंमत ५२,९९९ रुपये आणि 256GB व्हेरिएंटची किंमत ५९,९९९ रुपये आहे. हँडसेट यलो, बे, ओब्सीडियन आणि पोर्सिलेन कलरमध्ये उपलब्ध होईल. फोन आता फ्लिपकार्टवर प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे आणि सेल १४ मेला सकाळी ६:३० वाजल्यापासून सुरु होईल. Google निवडक बँक कार्डवर ४,००० रुपये ऑफ देखील देत आहे आणि १२ महिन्याचा नो-कॉस्ट ईएमआयचा ऑप्शन देखील आहे. Pixel 8a प्री-ऑर्डर केल्यावर Pixel Buds A-सीरीज फक्त ९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल.
हे देखील वाचा:
Google Pixel 8a चे स्पेसिफिकेशन्स
Google Pixel 8a ग्लास (स्क्रीन), पॉलीकार्बोनेट (रियर पॅनल) आणि एल्यूमीनियम (फ्रेम) पासून बनवण्यात आला आहे. याची डिजाइन Pixel 8 सीरिज सारखी आहे. यात IP67 बिल्ड मिळते.यात फ्लॅट ६.१-इंच सुपर अॅक्टुआ डिस्प्ले आहे, जो A-सीरीजमध्ये पहिल्यांदा सादर करण्यात आला आहे. हा OLED पॅनल १२० हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्ले जुन्या मॉडेल प्रमाणेच कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३ प्रोटेक्शनसह येतो. गेल्यावर्षी प्रमाणे, Google नं Pixel 8a मधील लेटेस्ट Tensor G3 चिप आणि टायटन M2 सिक्योरिटी दिला आहे. यात ‘सर्कल टू सर्च’, AI इमेज एडिटिंग (मॅजिक एडिटर), ऑडियो मॅजिक इरेजर, बेस्ट टेक आणि इतर अनेक एआय फीचर्स मिळतात. फोनमध्ये 8GB LPDDR5x रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज मिळते.
यात वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.३, एनएफसी, एक यूएसबी टाइप-सी पोर्ट आणि जीपीएस नेव्हिगेशन सिस्टमचा समावेश आहे. फोन मध्ये एक eSIM आणि एक फिजिकल सिम कार्ड वापरता येईल. हँडसेट इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट रीडर किंवा फेस अनलॉक चा वापर करून अनलॉक केला जाऊ शकतो. फोनमध्ये ४,४९२एमएएचची बॅटरी आहे आणि हा १८वॉट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. Pixel 8a मध्ये ७.५वॉट वायरलेस चार्जिंग सपोर्ट आहे.
कॅमेरा सेटअप मध्ये जास्त बदल करण्यात आला नाही. मागील बाजूस ६४-मेगापिक्सलचा (f/१.८९ अपर्चर) प्रायमरी कॅमेरा आणि १३-मेगापिक्सलचा (f/२.२ अपर्चर) अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. सेल्फीसाठी तुम्हाला १३ मेगापिक्सलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देखील मिळतो. Google चा Pixel 8a सामान्य Pixel युजर एक्सपीरिएंस सह Android 14 वर बूट होतो आणि हा सात वर्ष सॉफ्टवेयर आणि सिक्योरिटी अपडेट मिळतील. यात क्वार्टर्ली Pixel फीचर ड्रॉप्सचा देखील समावेश आहे.