Xiaomi ने लॉन्च केले अनोखे ड्रम वॉशिंग मशीन; हे कपड्यांमधले बॅक्टेरिया देखील टाकते काढून

Xiaomi ने आणले 8 किलोचे ड्रम वॉशिंग मशीन लाँच केले आहे. कंपनीचा दावा आहे की, हे नवीन वॉशिंग मशीन कपड्यांमधून बॅक्टेरिया आणि माइट्स काढून टाकण्यास सक्षम आहे आणि आपल्या इंटेलिजन्ट फीचरमुळे कपडे पूर्णपणे स्वच्छ करू शकते. हे चीनमध्ये लॉन्च केले गेले आहे आणि ते देशांतर्गत बाजारात खरेदीसाठी उपलब्ध आहे. त्याबद्दल सविस्तर माहिती देत आहोत.

किंमत आणि उपलब्धता

‘Xiaomi Mijia 8KG ड्रम वॉशिंग मशीन’ चीनमध्ये 999 युआन (सुमारे 11,500 रुपये) मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. GizmoChina च्या मते, हे सध्या किरकोळ विक्रेता JD.com द्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे. कंपनी सध्या भारतात घरगुती उपकरणे विकत नाही, त्यामुळे भारतात हे मशीन लॉन्च होण्याची शक्यता कमी आहे.

Xiaomi ड्रम वॉशिंग मशिनचे फीचर्स

  • Xiaomi MIJIA 8kg ड्रम वॉशिंग मशिनची रचना खूपच आकर्षक आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, या अल्ट्रा-थिन मशीनची बॉडी केवळ 495 मिमी जाडीची आहे, ज्यामुळे ते कमी जागा घेते.
  • यात टच स्क्रीन आहे आणि काही फंक्शन्स ऑपरेट करण्यासाठी एक फिजिकल नॉब देखील आहे.
  • मशीन BLDC मोटरने सुसज्ज आहे, जे झीज कमी करते आणि आवाज कमी करते.
  • हे उपकरण ड्रममध्ये ठेवलेल्या कपड्यांचे वजन ओळखते आणि त्यानुसार पाणी भरणे आणि धुण्याचे मोड निवडते.
  • कंपनीच्या दाव्यानुसार, MIJIA 8kg ड्रम वॉशिंग मशीनमध्ये 95ºC हायएस्ट टेम्प्रेचर लिमिट आहे आणि 99.99% च्या स्टरलायझेशन रेटसह ते खराब कपड्यांमधून बॅक्टेरिया साफ करू शकते.
  • 60 डिग्री सेल्सिअस तापमानात देखील वॉशिंग मशीन कपड्यांवरील माइट्स मारू शकते.
  • मशीनची एक खासियत म्हणजे मशीन चालू असतानाही त्यात कपडे घालता येतात.

Source link

Home Applianceswashing machinesXiaomiघरगुती उपकरणेवॉशिंग मशीन्सशाओमी
Comments (0)
Add Comment