Pune Crime: पुण्यात अतिमहत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा भेदली!; ‘ते’ आत आलेच कसे?

हायलाइट्स:

  • पुण्यात अतिमहत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा भेदली.
  • चंदनचोरांनी चंदनाची सहा झाडे चोरून नेली.
  • पोलिसांचा बंदोबस्त असतानाही झाली चोरी.

पुणे: पुणे शहरात चंदनचोरांकडून चोरीचे सत्र सुरूच असून, अतिमहत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा भेदून चोरटे चंदनाच्या झाडांची चोरी करीत असल्याचे दिसून आले आहे. वानवडी भागातील आर्म्ड फोर्सेस मेडिकल स्टोअर परिसरासह राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक दोन येथील ५० हजार रुपये किमतीची चंदनाची सहा झाडे चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. ( Pune Crime Latest News )

वाचा: एकनाथ खडसे नेमके आहेत कुठे?; कन्या रोहिणी यांनी दिली ‘ही’ माहिती

भारतीय सैन्य दलात नोकरीस असणारे मनोजकुमार चौहान (वय ४५, रा. पुलगेट) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वानवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉ. कोयाजी रस्त्यावर असलेल्या आर्म्ड फोर्सेस मेडिकल डेपो आवारातून चोरट्यांनी २६ ते २७ सप्टेंबर कालावधीत २२ हजार रुपये किमतीची दोन चंदनाची झाडे चोरून नेली. सुरक्षाव्यवस्था असूनही चोरट्यांनी चंदनाची झाडे चोरली. या प्रकरणी वानवडी पोलीस तपास करत आहेत.

वाचा:भुजबळ-कांदे वाद, अंडरवर्ल्डची एंट्री आणि भुजबळांनी दिले ‘हे’ आदेश

दुसऱ्या घटनेत राज्य राखीव पोलीस दल गट (एसआरपीएफ) क्रमांक दोन मधील २६ हजार रुपये किमतीची चार चंदनाची झाडे चोरून नण्यात आली. हा प्रकार ११ ते १२ सप्टेंबरदरम्यान घडला. ‘एसआरपीएफ’ मध्ये प्रवेश करणाऱ्या ठिकाणावर व आतदेखील पोलिसांचा बंदोबस्त आहे; तरीही चोरट्यांनी येथील सुरक्षा भेदून चार चंदनाची झाडे चोरल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सुरक्षाव्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाचा: सोमय्यांचं पुढचं टार्गेट जरंडेश्वर कारखाना; ठाकरे सरकार व पवारांना दिलं आव्हान

Source link

armed forces medical stores depotpune crime latest newspune wanwadi crime newssandalwood trees stolensandalwood trees stolen in puneआर्म्ड फोर्सेस मेडिकल स्टोअरपुणेराज्य राखीव पोलीस दलवानवडीवानवडी पोलीस
Comments (0)
Add Comment