हायलाइट्स:
- राज्यात ३ हजार १८७ नवीन रुग्णांचे निदान.
- सध्या करोनाचे ३६ हजार ६७५ सक्रिय रुग्ण.
- रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२६ टक्के एवढे.
मुंबई: राज्यात करोना संसर्गाची दुसरी लाट पूर्णपणे नियंत्रणात आल्याचे दिसत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत नवीन बाधितांची संख्या कमी होऊ लागली असून सक्रिय रुग्णांची संख्याही आता ३६ हजारांवर आली आहे. राज्यात तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत असली तरी सध्याचे चित्र मात्र दिलासादायक आहे. ( Coronavirus In Maharashtra Latest Update )
वाचा:भुजबळ-कांदे वाद, अंडरवर्ल्डची एंट्री आणि भुजबळांनी दिले ‘हे’ आदेश
राज्यात करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येचा मोठा उद्रेक पाहायला मिळाला. त्यानंतर आता स्थिती वेगाने सुधारत आहे. करोना रिकव्हरी रेट वाढता असून मृत्यूंचे प्रमाणही कमी होत आहे. आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आजच्या आकडेवारीवर नजर मारल्यास गेल्या २४ तासांत राज्यात करोनाने आणखी ४९ रुग्ण दगावले आहेत. या साथीच्या विखळ्यात सापडलेल्या १ लाख ३९ हजार ११ जणांना आतापर्यंत प्राणास मुकावे लागले आहे तर एकूण ६३,६८,५३० रुग्ण करोनावर मात करण्यात यशस्वी ठरले आहेत.
वाचा: सोमय्यांचं पुढचं टार्गेट जरंडेश्वर कारखाना; ठाकरे सरकार व पवारांना दिलं आव्हान
करोनाची आजची स्थिती:
– राज्यात आज ४९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
– सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.
– आतापर्यंत १ लाख ३९ हजार ११ रुग्ण करोनाने दगावले.
– आज राज्यात ३ हजार १८७ नवीन रुग्णांचे निदान.
– दिवसभरात ३ हजार २५३ रुग्ण बरे होऊन परतले घरी.
– राज्यात आजपर्यंत एकूण ६३,६८,५३० रुग्णांची करोनावर मात.
– राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२६ टक्के एवढे झाले आहे.
– आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,८५,८४,८१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,४७,७९३ (११.१८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले.
– राज्यात सध्या करोनाचे ३६ हजार ६७५ सक्रिय रुग्ण.
– सध्या राज्यात २,५२,३०९ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर १,४५३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये.
वाचा: एकनाथ खडसे नेमके आहेत कुठे?; कन्या रोहिणी यांनी दिली ‘ही’ माहिती