Eknath Khadse: एकनाथ खडसे नेमके आहेत कुठे?; कन्या रोहिणी यांनी दिली ‘ही’ माहिती

हायलाइट्स:

  • एकनाथ खडसे कामानिमित्त बाहेरगावी गेलेत.
  • कन्या रोहिणी खडसे यांनी दिली माहिती.
  • ईडीने कोणतीही जप्तीची कारवाई केलेली नाही.

जळगाव: पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथील भूखंड खरेदीतील कथित गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील फार्म हाऊस व घरावर ईडीने जप्तीची कारवाई केल्याची केवळ अफवा आहे, असे स्पष्ट करतानाच एकनाथ खडसे हे कामानिमित्त बाहेरगावी गेले आहेत, अशी माहिती खडसे यांच्या कन्या व जळगाव जिल्हा बँकेच्या चेअरमन अॅड. रोहिणी खडसे यांनी ‘मटा’शी बोलताना दिली आहे. ( Eknath Khadse Latest Breaking News )

वाचा: सोमय्यांचं पुढचं टार्गेट जरंडेश्वर कारखाना; ठाकरे सरकार व पवारांना दिलं आव्हान

भोसरी एमआयडीसीतील भूखंडाच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडी कडून खडसे व त्यांच्या कुटुंबीयांची कसून चौकशी सुरू आहे. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना याप्रकरणात ईडीने अटक केलेली आहे तर खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनाही ईडीने चौकशीचे समन्स बजावले आहे. प्रकृतीच्या कारणास्तव मंदाकिनी खडसेंनी वेळ मागून घेतला आहे. दुसरीकडे, स्वतः खडसेंची देखील या प्रकरणात चौकशी झाली आहे.

वाचा:भुजबळ-कांदे वाद, अंडरवर्ल्डची एंट्री आणि भुजबळांनी दिले ‘हे’ आदेश

याच प्रकरणात ईडीने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथील खडसेंचे फार्म हाऊस व निवासस्थान सील केल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू होती. खडसे यांना ईडीने ताब्यात घेतल्याचीही वार्ता पसरली होती. याबाबत खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी माहिती दिली असून ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. या बाबी निव्वळ अफवा असून त्यात कोणतेही तथ्य नाही. शिवाय कोणतीही जप्तीची कारवाई झालेली नाही किंवा नोटीसही आलेली नाही, अशी माहिती अॅड. रोहिणी खडसे यांनी दिली.

वाचा:चिपी विमानतळ उद्घाटन: निमंत्रण पत्रिकेत नारायण राणेंचे नाव कितव्या क्रमांकावर?

Source link

eknath khadse ed probe updateeknath khadse latest breaking newseknath khadse latest newspune land caserohini khadse on ed probeएकनाथ खडसेगिरीश चौधरीभोसरी एमआयडीसीमु्क्ताईनगररोहिणी खडसे
Comments (0)
Add Comment