गुगल पे आणि गुगल वॉलेटमधील फरक
गुगलनं स्पष्ट केलं आहे की गुगल पे एक पेमेंट अॅप आहे. तर गुगल वॉलेट एक डिजिटल डॉक्यूमेंट ठेवण्यासाठी आलेलं अॅप आहे. विशेष म्हणजे याआधी देखील कंपनीनं गुगल वॉलेट भारतात लाँच केलं होतं परंतु प्रतिसाद चांगला नसल्यामुळे बंद करण्यात आलं होतं. तर युएसएसमध्ये कंपनीनं गुगल पे बंद करून गुगल वॉलेट सुरु ठेवलं आहे.
सोप्या शब्दांत गुगल वॉलेट बद्दल सांगायचं झालं तर एकेकाळी पेपर ट्रेन तिकीट आणि चित्रपटाचं तिकीट मिळत होते. तसेच कागदी स्वरूपात शिक्षणापासून सर्वच कागदपत्र उपलब्ध होते तेव्हा एवढे सर्व कागदपत्र ठेवण्यासाठी फिजिकल वॉलेट मिळत होते. हल्ली डॉक्यूमेंट, ट्रेन, बस आणि सिनेमा हॉल तिकीटसह ऑफिशियल आणि पर्सनल डॉक्यूमेंट देखील डिजिटल झाले आहेत, जे ठेवण्यासाठी डिजिटल वॉलेटची आवशक्यता आहे. असंच एक डिजिटल वॉलेट गुगलनं सादर केलं आहे. जसं सरकारनं digiLocker अॅप सादर केलं आहे. ते देखील एक प्रकारचं डिजिटल वॉलेट आहे,
तर गुगल पे एक ऑनलाइन युपीआय पेमेंट अॅप आहे. या ॲपच्या मदतीनं ग्राहक पैश्यांची देवाणघेवाण करू शकतात. तसेच रिचार्ज, बिल्स पेमेंट देखील करू शकतात. युपीआय आधारित पेमेंटसाठी या ॲपचा वापर मोठ्याप्रमाणात केला जातो.
गुगल वॉलेट मध्ये ठेवता येणारी कागदपत्रे
- फ्लाइट पास
- ट्रांजिट कार्ड्स
- इव्हेंट तिकीट
- बोर्डिंग पास
- गिफ्ट कार्ड
- क्रेडिट कार्ड/डेबिट कार्ड
कुठून करता येईल डाउनलोड
गुगल वॉलेट गुगल प्ले स्टोरवर लिस्ट करण्यात आलं आहे. जिथून युजर्स गुगल वॉलेट डाउनलोड करू शकतात. परंतु iOS आधारित डिवाइस जसे की आयफोन गुगल वॉलेटसाठी प्रतीक्षा करावी लागेल.