केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाला विरोध करताना ईडीने न्यायालयात जे प्रतिज्ञापत्र दाखल केले, त्यात न्यायालयाने याआधीच्या सुनावणीत जे मुद्दे मांडले, त्यांना विरोध करण्याची भूमिका घेतली. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि दीपांकर दत्ता यांच्या न्यायालयात ईडीचे उपसंचालक भानुप्रिया यांनी प्रतिज्ञापत्र दाखल केले. दिल्ली दारू धोरण प्रकरणी केजरीवाल सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी आपल्याला जामीन मंजूर करावा, अशी विनंती केजरीवाल यांनी केली आहे. दिल्ली व पंजाब येथे आम आदमी पक्ष सत्तेवर असल्याने, दोन्ही राज्यांत २५ मे व १ जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत ‘आप’ उमेदवारांचा प्रचार केजरीवाल यांनी करणे आवश्यक असल्याचे त्यांच्या वकिलांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
– केजरीवाल हे अट्टल गुन्हेगार नाहीत
– ही एक अभूतपूर्व परिस्थिती आहे. लोकसभा निवडणुका सुरू आहेत. ते दिल्लीचे निवडून आलेले मुख्यमंत्री आहेत
– निवडणुका झाल्या नसत्या, तर अंतरिम जामिनाचा प्रश्नच निर्माण झाला नसता