माझा लहान भाऊ तोफ, त्याला महत्प्रयासानं रोखलंय, अन्यथा…; ओवैसींचा नवनीत राणांना इशारा

हैदराबाद: पोलिसांना १५ सेकंदांसाठी हटवा. कोण कुठून आलं आणि कुठून गेलं हे दोन्ही भावांना कळणार नाही, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आणि अमरावतीच्या खासदार नवनीत राणांनी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी आणि त्यांचे आमदार बंधू अकबरुद्दीन ओवैसी यांना थेट इशारा दिला. आता असदुद्दीन ओवैसींनी राणा यांना प्रतिआव्हान दिलं आहे. नवनीत राणांनी हैदराबादमध्ये भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्यासाठी प्रचारसभा घेतली. त्यात त्यांनी केलेल्या विधानांमुळे वाद उफाळला आहे.

२०१३ मध्ये अकबरुद्दीन ओवैसींनी १५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा, असं म्हणत आव्हान दिलं होतं. आता या १५ मिनिटांच्या आव्हानाला राणांनी प्रतिआव्हान दिलं. आम्हाला १५ सेकंद पुरेशी आहेत, असं त्या जाहीर सभेत म्हणाल्या. यानंतर असदुद्दीन ओवैसींनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यातून त्यांनी राणांवर पलटवार केला आहे. ‘मी काय कोंबडीचं पिल्लू आहे का? कुठे यायचंय ते सांगा,’ अशा शब्दांत ओवैसींनी प्रतिआव्हान दिलं आहे.
भुजबळांनी राजीनामा द्यावा! सेना आमदाराची मागणी; महायुतीत जुंपली, ‘मित्रां’मुळे भाजपची गोची
‘छोटा (अकबरुद्दीन ओवैसी) कोणाच्या बापाचं ऐकणारा नाही. त्याला समजावू शकणाऱ्याचं नाव असदुद्दीन ओवैसी आहे. ज्या दिवशी मी लहान भावाला सांगितलं, मी आराम करतो, आता तू सांभाळ. मग त्यावेळी तुम्हीच सांभाळा. तुम्हाला छोटा माहितीय ना? तोफ आहे तो,’ अशा शब्दांत ओवैसींनी राणांना अप्रत्यक्ष आव्हान आहे.

महाराष्ट्रातून आलेल्या खासदार मॅडम छोटे-छोटे करत आहेत. अहो मी त्या छोट्याला रोखून ठेवलंय. तुम्हाला माहितीय का छोटा काय आहे? मोठ्या मुश्किलीनं मी त्याला रोखून ठेवलंय. तो जर सुरु झाला तर मग टी-२०. आम्ही काय कोंबडीची पिल्लं आहोत का? १५ सेकंदांत हे करु अन् ते करु. भारतात कायदा नाहीए का? पोलीस नाहीएत का? कोणीही येतंय आणि बोलून जातंय, अशा शब्दांत त्यांनी राणांना रडारवर घेतलं.

Source link

aimimasaduddin owaisibjpNavneet Ranaअसदुद्दीन ओवैसीएमआयएमनवनीत राणाभाजप
Comments (0)
Add Comment