Ashish Shelar makes allegations: ‘आणि मागच्या दाराने कट-कमिशन खायचं’; आशीष शेलारांचा शिवसेनेवर गंभीर आरोप

हायलाइट्स:

  • भाजप आमदार आशीष शेलार यांचे मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांवरन शिवसेनेवर टीकास्त्र.
  • रस्त्यांच्या कामात कंत्राटदाराकडून कट-कमिशन खाण्याचा शेलार यांचा गंभीर आरोप.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामासंदर्भात दिलेत कारवाईचे आदेश.

मुंबई: मुंबईतील रस्त्यांचा प्रश्न आता ऐरणीवर आला रस्त्यांच्या कामासाठी असून निधीचा विनियोग व्यवस्थित झालेला नसेल किंवा कामचुकारपणा केलेला आढळल्यास कंत्राटदार आणि अधिकाऱ्यावर कारवाई करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी दिले आहेत. मात्र, असे असले तरी भाजप आमदार आशीष शेलार (MLA Ashish Shelar) यांनी रस्त्यांच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर (Shiv Sena) टीकेचे प्रहार केले आहेत. मुंबई महानगरपालिका (BMC) आणि शिवसेनेवर टीकास्त्र सोडताना शेलार यांनी पाठीमागील दाराने बिले काढून कट-कमिशन खाण्याचा गंभीर आरोप केला आहे. (bjp mla ashish shelar makes serious allegations on shiv sena regarding road construction work in mumbai)

भाजप नेते, आमदार आशीष शेलार यांनी गेल्या काही दिवसांपासून रस्त्यांवरील खड्ड्यांचा मुद्दा लावून धरला आहे. मुंबई महानगरपालिकेचे पोर्टल म्हणत आहे की, मुबईत केवळ ९२७ खड्डे आहेत. खड्ड्यांबाबत केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देण्यात मात्र यात महापौरांची धावाधाव होत आहे. प्रत्यक्षात मात्र मुंबईच्या रस्त्यांवर ४२ हजार खड्डे असल्याचा दावा आहे. यासाठी ४८ कोटींचा निधी देण्यात आला आहे. शहरात पाहिले असता रस्त्यांची चाळण झालेली दिसते. मुंबईत रस्त्यांचे निकृष्ट दर्जाचे काम झालेले दिसते. या स्थितीमुळे मुंबईकर हैराण झालेले आहेत, असे शेलार यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा- राज्यात पूरस्थिती; राज ठाकरे यांच्या राज्य सरकारकडे ‘या’ महत्वाच्या मागण्या

शेलार यांनी ट्विट करत हे आरोप केले आहेत. शेलार पुढे म्हणतात, की एकीकडे कंत्राटदारांवर कारवाई करा म्हणायचे आणि पाठीमागच्या दाराने बिले काढून कट-कमिशन खायचे, सब गोलमाल है.

गेल्या २४ वर्षांमध्ये २१ हजार कोटी रुपये खड्ड्यात घातल्याचे सांगत शेलार यांनी तरी मुंबईतील रस्त्यांचे ‘रस्ते’ चांगले लागले. आता धावते दौरे करून, कारवाईची आरडाओरड करून काय सांगताय, असा सवाल केला आहे.

क्लिक करा आणि वाचा- ‘शेतकऱ्यांनी धीर सोडू नये’; पूरस्थितीबाबत मुख्यमत्र्यांचे प्रशानाला ‘हे’ आदेश

शेलार आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, ”मी कट-कमिशन खाल्ले तर बुडबुड घागरी!’ तेच कंत्राटदार..त्याच निविदा..तीच थूकपट्टी.. कसं पटणार मुंबईकरांना..खड्ड्यांनी पितळ उघडं केलं!’

क्लिक करा आणि वाचा- ‘भाई युनिर्व्हसिटीचा मी कधीच विद्यार्थी नव्हतो’,भाईगिरीवरून कांदे-भुजबळ यांच्यात जुंपली

Source link

cm uddhav thackerayMLA Ashish Shelarshiv senaआमदार आशीष शेलारकट-कमिशनमुंबई महानगरपालिकामुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Comments (0)
Add Comment