Kedarnath Dham Opening 2024 : अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर केदारनाथ धाम यात्रेला सुरुवात, भगवान शंकराच्या या ६ मंदिरांना जरुर भेट द्या

Kedarnath Dham Yatra 2024 :
यंदा अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर १० मे रोजी भाविकांसाठी केदारनाथ धामचे दरवाजे दर्शनासाठी खुले होणार आहे. १२ ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या केदारनाथच्या दर्शनासाठी लाखो भाविक या ठिकाणी येतात.

केदारनाथ हे शिवभक्तांचे आवडते ठिकाण मानले जाते. भारतातील उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील शहर केदारनाथ. केदारनाथ हे चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. हिमालयतील मंदाकिनी नदीच्या उगमस्थानी बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेले ठिकाण.

आपल्यापैकी अनेकांना केदारनाथला जाण्याची इच्छा असते. भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी बरेचजण चारधाम यात्राच्या प्लान करतात. यंदा केदारनाथ धामचे मंदिर भाविकांसाठी अक्षय्य तृतीयाच्या दिवशी खुले होणार आहे. त्यांनंतर लाखो भाविक भोले बाबाचे दर्शन घेतील.

केदारनाथ हे हिंदू देवता शिवाला समर्पित असणाऱ्या तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. जर यंदा तुम्ही देखील केदारनाथला जाणार असाल तर या ६ ठिकाणांना जरुर भेट द्या.

त्रियुगी नारायण मंदिर

त्रियुगी नारायण मंदिर सोनप्रयागपासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. या मंदिराबद्दल असा समज आहे की, भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह या ठिकाणी झाला होता. त्यावेळी साक्षीदार म्हणून भगवान विष्णू होते. त्याच्या सन्मानार्थ त्रियुगीनारायण मंदिर बांधले गेले. असे म्हटले जाते की, या विवाहाची वेळी भगवान विष्णूंनी पार्वतीचा भाऊ म्हणून सर्व कार्य केले. तर भगवान ब्रह्मदेवानी पुरोहिताची भूमिका केली होती.

गौरीकुंड

जर तुम्ही केदारनाथला जात असाल तर गौरीकुंडला नक्की भेट द्या गौरीकुंड हे मंदाकिनी नदीच्या किनाऱ्याजवळ वसलेले आहे. याला मोक्षाचे प्रवेशद्वार मानले जाते. गौरीकुंड मंदिर आणि गौरी तलाव हे समुद्रापासून २ हजार मीटर उंचीवरील महत्त्वाचे ठिकाण आहे. खाली वाहणाऱ्या वासुकी गंगेमुळे येथील आजूबाजूचा परिसर अतिशय सुंदर, हिरवागार आणि मनमोहक दिसतो. या ठिकाणी गरम पाण्याचा छोटा झरा देखील वाहतो. सोनप्रयागापासून गौरीकुंड ६ किलोमीटर अंतरावर आहे.

रुद्र गुहा केदारनाथ

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या ठिकाणी ध्यान केल्यानंतर हे ठिकाण अतिशय लोकप्रिय झाले आहे. रुद्र गुहा हे उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिरापासून १ किमी अंतरावर स्थित असणारे शांत असे ठिकाण आहे. पर्यटकांच्या सुविधा लक्षात घेऊन या ठिकाणी सिंगल बेड, गीझरची सुविधा, स्नानगृह, पाणी, हिटर आणि सीलिंग बेल याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

वासुकी ताल तलाव

पौराणिक मान्यतेनुसार वासुकी तलाव सरोवरचा संबंध हा भगवान विष्णूशी येतो असे म्हटले जाते. रक्षाबंधनाच्या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णूंनी या तलावात स्नान केले होते. त्यामुळे याला वासुकी ताल तलाव म्हणून ओळखले जाते. या तलावावरुन चौखंबा शिखरांचे सुंदर असे दृश्य पाहायला मिळते. येथील दृश्य पर्यटकांना अधिक आकर्षित करते. याच्या आजूबाजूला असणारी जागा रॅकिंगसाठी सगळ्यात चांगली मानली जाते.

भैरवनाथ मंदिर

केदारनाथ मंदिराच्या दक्षिण दिशेच्या ५०० मीटर अंतरावर भैरवनाथ स्वयंभू मंदिर आहे. हे मंदिर मोकळ्या आकाशाखाली टेकडीच्या माथ्यावर वसलेले आहे. या ठिकाणाहून तुम्हाला हिमालयाचे आणि संपूर्ण केदारनाथच्या खोऱ्याचे सुंदर दृश्य पाहता येते. भगवान भैरव हे शिवाचे मुख्य गण मानले जाते. या मंदिराला छत नाही.

सोनप्रयाग

सोनप्रयाग हे भारतातील उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गाव आहे. हे १,८२९ मीटर उंचीवर वसलेले धार्मिक स्थळ. असे म्हटले जाते की, या ठिकाणी भगवान शंकर आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता. निसर्गसौंदर्य आणि बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेले हे दृश्य पाहण्यासारखे आहे. या ठिकाणी मंदाकिनी नदी आणि बासुकी नदीचा संगम पाहता येतो. असे म्हटले जाते येथील पाण्याला स्पर्श केल्यानंतरच वैकुंठ धाम गाठता येतो. हे ठिकाण केदारनाथपासून २०.४ किलोमीटर अंतरावर आहे.

Source link

Char dham Yatra uttarakhand char dham yatrakedarnath Dhamkedarnath opening date 2024lord shiva templeउत्तराखंडकेदारनाथ धामभैरवनाथ मंदिररुद्र गुहा केदारनाथवासुकी ताल तलावसोनप्रयाग
Comments (0)
Add Comment