पाकिस्तानकडे अणूबॉम्ब, भारताने आदर राखावा; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी तारे तोडले

नवी दिल्ली : वारसा कर आणि भारतीयांबाबत वर्णद्वेषी वक्तव्य करणारे इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे माजी अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्यानंतर आता आणखी एका काँग्रेस नेत्याने वक्तव्यातून वाद निर्माण केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानबाबत विधान करत वाद ओढावून घेतला आहे.

आपल्या शेजारी देशाकडे अणुबॉम्ब असल्याने भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे, असे मणिशंकर अय्यर यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. आपण पाकिस्तानचा आदर केला नाही तर ते भारतावर अण्वस्त्र हल्ला करण्याचा विचार करू शकतात, असंही ते म्हणाले.

पाकिस्तानकडेही अण्वस्त्रे आहेत हे भारताने विसरू नये. पाकिस्तानमध्ये दहशतवाद आहे म्हणून आम्ही चर्चा करणार नाही असे सध्याचे सरकार का म्हणते, ते मला समजत नाही. दहशतवाद संपवण्यासाठी चर्चा खूप महत्त्वाची आहे, हे समजून घेणे आवश्यक आहे. अन्यथा भारत अहंकाराने आपल्याला जगात कमी लेखत आहे, असे पाकिस्तान समजेल. अशा परिस्थितीत पाकिस्तानातील कोणताही वेडा या बॉम्बचा वापर करू शकतो, असं अय्यर म्हणाले.
जेल की पक्षबदल, दोनच मार्ग होते, पत्नीलाही गोवल्याने जड अंतःकरणाने निर्णय, नियतीने ही वेळ कुणावर आणू नये, वायकर व्याकुळ
पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, आपल्याकडेही आहेतस पण जर एखाद्या वेड्या माणसाने हा बॉम्ब लाहोरमध्ये टाकायचा ठरवला तर? हे रेडिएशन अमृतसरपर्यंत पोहोचायला आठ सेकंदही लागणार नाहीत. जर आपण त्यांचा आदर केला तर ते शांत राहतील, पण जर आपण त्यांना कमी लेखत राहिलो तर कोणीतरी वेडा येऊन बॉम्ब टाकेल, असंही अय्यर म्हणाले.
Arvind Sawant : मराठी माणूस सरस्वतीपूजक, लक्ष्मीपूजक होत नाही; मुंबई सोडणं पराभूत वृत्ती, अरविंद सावंत यांचं मत
मी असं म्हणत नाही की, आपले प्रश्न कसे सुटतील याचा विचार करायला हवा. हे तज्ज्ञांचे काम आहे. माझे म्हणणे एवढेच आहे, की तुम्ही द्वेष पसरवून किंवा बंदुका दाखवून परिस्थिती सुधारु शकत नाही. पाकिस्तान हे सार्वभौम राष्ट्र आहे, त्यांचीही इज्जत आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यांचा आदर राखून आपण त्याच्याशी कठोरपणे बोलले पाहिजे. आता काय होत आहे? आपण बोलत नाही, यामुळे तणाव वाढत आहे, असं अय्यर म्हणाले.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध दृढ करण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. मात्र गेल्या 10 वर्षांपासून सर्व चर्चा थांबल्या आहेत. जेव्हा समोरच्या व्यक्तीकडे बळ नसतं, तेव्हा आपण शक्ती दाखवली पाहिजे. रावळपिंडीच्या कहुटा येथे त्यांचं बळ आहे. गैरसमज पसरला तर खूप त्रास होईल. पाकिस्तानशी युद्धाच्या भीतीमुळे राजीव गांधींनी शांततेचा मार्ग शोधला होता. पण आजच्या काळात पाकिस्तानसोबत शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता असूनही मोदीजी युद्धाचा मार्ग शोधत आहेत, असं अय्यर म्हणाले.

Source link

Atom BombCongress leader Controversial StatementIndia-PakistanMani Shankar Aiyarकाँग्रेस नेते वादग्रस्त वक्तव्यपाकिस्तान अणूबॉम्बभारत-पाकिस्तानमणिशंकर अय्यर
Comments (0)
Add Comment