Galaxy F55 5G लाँच डेट
Samsung Galaxy F55 5G भारतात १७ मेला लाँच होणार आहे. फोन दुपारी १२ वाजता लाँच केला जाईल. कंपनीनं सांगितलं आहे की फोनची किंमत भारतात ३० हजार रुपयांपेक्षा कमी असेल. फोनची विक्री Flipkart वरून केली जाईल. तसेच हा Samsung.com वरून देखील विकत घेता येईल. Flipkart वर फोनसाठी लँडिंग पेज लाइव्ह झालं आहे. फोन Apricot Crush आणि Raisin Black कलर व्हेरिएंट्समध्ये सादर केला जाईल. यात विगन लेदर फिनिश मिळेल.
फोनच्या किंमतच्या बाबतीत अलीकडेच लीकमधून माहिती समोर आली हतोय की या फोनचा बेस व्हेरिएंट ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसह येईल ज्याची किंमत २६,९९९ रुपये असेल. तर २५६ जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत २९,९९९ रुपये असेल. तसेच फोनचा १२ जीबी रॅम, आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंट ३२,९९९ रुपयांमध्ये विकत घेता येईल.
जर फोनचा Galaxy C55 रिब्रँडेड व्हर्जन असेल तर स्पेसिफिकेशन्स देखील जवळपास सारखे असू शकतात. Galaxy C55 मध्ये ६.७ इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यात १,०८०x२,४०० पिक्सल रिजॉल्यूशन आहे. फोनमध्ये कंपनीनं सुपर ॲमोलेड डिस्प्ले दिला आहे. यात १२०हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळतो. फोन स्नॅपड्रॅगन ७ जेन १ चिपसेटसह आला आहे. यात मागे तीन कॅमेरा असलेला सेटअप आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा सेल्फी शूटर देण्यात आला आहे. त्याचबरोबर ५०००एमएएचची बॅटरी मिळते जी ४५वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.