ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर या नावाने ओळख
तिंबोटी खंड्या या पक्षाला इंग्रजीमध्ये ओरिएंटल ड्वार्फ किंगफिशर (Oriental Dwarf Kingfisher) असे म्हणतात. हा पक्षी रायगड जिल्ह्यात मे ते ऑक्टोबर या महिन्यांमध्ये दिसतो. प्रामुख्याने गलात ओढा, तलाव, मातीचे कडे आणि भुसभुशीत जमीन असलेल्या ठिकाणी तिबोटी खंड्याचे वास्तव्य असते. अशा ठिकाणी तो सुमारे एक मीटर लांबीचे घरटे तयार करतो.
या पक्षाची कापाळावर काळा-निळा ठिपका लक्ष वेधून घेतो. मानेवर हळदी आणि पांढऱ्या रंगाची पिसे, नारंगी ठाशीव चोच, गडद निळ्या आणि काळ्या रंगाचे पंख आणि पंखांवर लक्ष वेधून घेणारे मोरपीशी रंगाचे ठिपके, नारंगी रंगाचे पाय आणि नारंगी गुलाबी रंगछटा असलेली विविध रंगी शेपूट यामुळे हा पक्षी वैशिष्ठ्यपूर्ण दिसतो.
क्लिक करा आणि वाचा- ‘आणि मागच्या दाराने कट-कमिशन खायचं’; आशीष शेलारांचा शिवसेनेवर गंभीर आरोप
भूतान आणि श्रीलंकेहून येतो रायगडमध्ये
तिबोटी खंड्या हा पक्षी भूतान, भारतातील ईशान्य आणि अग्नेय भागात आढळतो. तसेच तो श्रीलंकेतही आढळतो. तेथून हा पक्षी मे महिन्याच्या सुमारास प्रजननासाठी रायगडमध्ये येतो. रायगड जिल्ह्यात तो ऑक्टोबर महिन्यापर्यंत राहतो.त्यानंतर तो परत जातो. भारतात खंड्या पक्षाच्या १२ प्रजाती आढळतात. त्यांपैकी तिबोटी खंड्या हा पक्षी आकाराने सर्वात लहान आहे. त्यांची लांबी १२ सेमी ते १४ सेमी इतकी असते.
क्लिक करा आणि वाचा- राज्यात पूरस्थिती; राज ठाकरे यांच्या राज्य सरकारकडे ‘या’ महत्वाच्या मागण्या
नर तिबोटी खंड्या मादीला शीळ घालून बोलावतो
हे नर-मादी पक्षी एकमेकांना शीळ घालून साद देतात. नर आणि मादी यांची जोडी जमल्यावर ओहळाशेजारी किंवा मातीच्या कडामध्ये नर आणि मादी बीळ करतात. तिबोटी खंड्या हे काम जून ते जुलै महिन्यात करतात. या स्वत: तयार केलेल्या घरट्यात ५ अंडी घालतात. एकाच वेळी अंडी न घालता खंड्या दिवसाला एक अंडी घालतो. मादीने अंडी दिल्यानंतर नर आणि मादी दोघेही अंडी उबवतात. त्यांचा अंडी उबवण्याचा कालावधी हा साधारण १७-१८ दिवसांचा असतो. तिबोटी खंड्याचे कोळी, बेडूक, पाल, सापसुरळी, छोटी खेकडी हे आवडते खाद्य आहे.
मानवी हस्तक्षेपामुळे तिबोटी खंड्याला धोका
तिबोटी खंड्या या पक्षाचे आयुर्मान चार ते पाच वर्षांचेच असते. मानवी हस्तक्षेपामुळे तिबोटी खंड्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. मानवी हस्तक्षेपामुळे त्याचा अधिवास नष्ट होण्याचा धोका असतो. असे होऊ नये आणि त्याला जगण्यासाठी पोषक वातावरण निर्माण व्हावे यासाठी तिबोटी खंड्याला रायगड जिल्ह्याचा पक्षी घोषित करण्यात आले आहे.
क्लिक करा आणि वाचा- ‘शेतकऱ्यांनी धीर सोडू नये’; पूरस्थितीबाबत मुख्यमत्र्यांचे प्रशानाला ‘हे’ आदेश
तिबोटी खंड्या या पक्षाबद्दल लोकांना योग्य ती माहिती नाही. या पक्षाबाबत लोकांना माहिती झाल्यास त्याचे संरक्षण होण्यास मदत मिळेल आणि म्हणूनच त्याला रायगड जिल्ह्याचा पक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे, असे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. आता तिबोटी खंड्याचे जतन व संवर्धन करणे शक्य होणाक असल्याचेही त्या म्हणाल्या.