- सर्व प्रथम, फसवणूक करणारे लोकांना कॉल करता आणि ग्रुप चॅटचे सदस्य असल्याचे भासवून त्यांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करतात.
- फसवणूक करणारे बनावट फोटो आणि नावे वापरत आहेत जेणेकरून लोकांना ते खरे वाटतात.
- स्कॅमर लोकांना फोनवर सांगतात की ते एक कोड (OTP) पाठवतील, जो ग्रुप कॉलमध्ये सामील होण्यासाठी टाकावा लागेल.
- 4मग ते तुम्हाला तो कोड (OTP) त्यांच्यासोबत शेअर करण्यास सांगतात जेणेकरून तुम्ही कॉलमध्ये सामील होऊ शकता.
हा कोड तुमच्या व्हॉट्सॲपची दुसऱ्या डिव्हाइसवर नोंदणी करतो. यामुळे तुमचे व्हॉट्सॲप खाते फसवणूक करणाऱ्यांच्या हाती जाते. यानंतर ते अकाऊंटमध्ये टू-स्टेप्स व्हेरीफिकेशन ऑन करतात, ज्यामुळे यूजर त्याचे अकाऊंट पुन्हा लॉग इन करू शकत नाही.
नंतर स्कॅमर्स काय करतात?
खाते चोरी केल्यानंतर, स्कॅमर्स काँटॅक्ट लिस्टमधील लोकांना मेसेज पाठवतात आणि मदतीच्या बहाण्याने पैशांची मागणी करतात. स्कॅमर्स लोकांना ताबडतोब पैसे पाठवायला सांगतात, ते इमर्जन्सी असल्याचे भासवतात
व्हॉट्सॲप ग्रुप स्कॅम कसा टाळता येईल?
तुमचे WhatsApp सुरक्षित ठेवण्यासाठी, टू-स्टेप्स व्हेरीफिकेशन करा. यामुळे तुम्हाला अतिरिक्त चांगली सुरक्षा मिळते. यासह, इतर कोणीही तुमच्या खात्यात लॉग इन करू शकणार नाही. तसेच, तुमचा सहा अंकी पिन कधीही कोणाशीही शेअर करू नका, जरी ते तुमचे मित्र किंवा नातेवाईक असले तरीही. तुम्हाला कोणताही संशयास्पद मेसेज मिळाल्यास, त्या व्यक्तीला थेट कॉल करा आणि त्याची माहिती जाणून घ्या.