काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कोविशील्ड लस बनवणाऱ्या AstraZeneca ने ब्रिटिश उच्च न्यायालयात या लसीच्या दुष्परिणामांची कबुली दिली आहे. त्यामुळे अनेकांची चिंता वाढली आहे. यातील एक चिंता म्हणजे बऱ्याच लोकांना आपण कोणती लस घेतली होती हेच लक्षात नाही. आपण आज हेच पाहणार आहोत की CO-WIN पोर्टल, आरोग्य सेतू ॲप आणि उमंग ॲपवरून वॅक्सीन सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं. कारण वॅक्सीन सर्टिफिकेटवर तुम्ही कोणती लस घेतली होती ते स्पष्ट दिसेल.
Co-WIN वेबसाइटवरून वॅक्सीन डाउनलोड करण्याची पद्धत
Aarogya Setu App वरून वॅक्सीन सर्टिफिकेट
UMANG App मधून कोविड-१९ लसीकरण प्रमाणपत्र
Co-WIN वेबसाइटवरून वॅक्सीन डाउनलोड करण्याची पद्धत
पुढील स्टेप्स फॉलो करून तुम्ही कोविन पोर्टल वरून वॅक्सीन सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता:
- सर्वप्रथम Co-WIN पोर्टल ओपन करण्यासाठी www.cowin.gov.in वर जा.
- तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाकून ओटीपी मिळवा.
- तुमच्या मोबाइलवर आलेला OTP सबमिट करून लॉगिन करा.
- समोरच्या डॅशबोर्डवर तुम्ही कोणती लस घेतली होती ते दिसेल.
- तसेच तुमच्या नंबरवर रजिस्टर केलेल्या परिवारातील सदस्यांच्या लसीची देखील माहिती दिसेल.
- सर्टिफिकेटच्या खाली ‘Download’ बटनवर क्लिक करून तुम्ही पीडीएफ फॉरमॅटमध्ये सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता.
Aarogya Setu App वरून वॅक्सीन सर्टिफिकेट
आरोग्य सेतू ॲप वापरून देखील तुम्ही कोविड-१९ लसीकरण प्रमाणपत्र मिळवू शकता, फक्त पुढील स्टेप्स फॉलो करा.
- सर्वप्रथम Aarogya Setu ॲप गुगल प्ले स्टोरवरून डाउनलोड आणि इन्स्टॉल करा.
- इथे देखील तुमचा मोबाइल नंबर टाकून लॉगिन करा.
- ॲपमध्ये असलेल्या ‘Co-WIN’ वर क्लिक करा म्हणजे एक मेन्यू ओपन होईल.
- इथे ‘Vaccine Certificate’ ऑप्शनवर क्लिक करा आणि तुमचा १३ अंकी बेनिफिशरी आयडी टाका.
- त्यानंतर ‘Get Certificate’ लिंकवर क्लिक करून तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड करा.
UMANG App मधून कोविड-१९ लसीकरण प्रमाणपत्र
तुम्ही उमंग ॲपवरून देखील वॅक्सीन सर्टिफिकेट मिळवू शकता, यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
- गुगल प्ले स्टोरवर जाऊन UMANG ॲप शोधा आणि ते इन्स्टॉल करा.
- त्यानंतर ‘What’s New’ सेक्शनमध्ये जा.
- इथे ‘Co-WIN’ शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- त्यानंतर ‘Download Cowin Certificate’ ऑप्शन क्लिक करा आणि तुमचा मोबाइल नंबर टाका.
- तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल तो सबमिट करा.
- तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड होऊ लागेल.