Paytm Gas Cylinder Booking: Paytm गॅस सिलेंडर बुकिंगचा देखील ऑप्शन उपलब्ध करुन देते. तुम्हालाही नवीन गॅस सिलिंडर बुक करायचे असेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता. पेटीएमच्या साइटला भेट दिल्यानंतर युजर्सला प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तीन रिचार्जवर कॅशबॅक ऑफर दिली जाते. पण प्रत्येक युजरला ही ऑफर मिळेलच असे नाही.
Paytmने सांगितल्यानुसार, ही ऑफर मोबाईल/डीटीएच रिचार्ज, वीज/मोबाइल/गॅस बिल पेमेंट आणि गॅस सिलेंडर बुकिंगवर लागू आहे. याअंतर्गत तुम्हाला बिल भरल्यावर 10 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो. म्हणजेच प्रत्येक युजरला वेगळी ऑफर दिली जाईल. त्यामुळेच कॅशबॅकची रक्कमही वेगळी असू शकते. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी, तुमचे पेमेंट 48 रुपये किंवा त्याहून अधिक असावी.
Amazon Pay- तुम्ही Amazon Pay च्या मदतीने पेमेंट करू शकता. यातून तुम्हाला खूप मोठी ऑफरही मिळेल. Amazon वरून गॅस सिलेंडर बुक केल्यास 50 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक दिला जात आहे. विशेष म्हणजे गॅस एजन्सीला कॉल करुन वेळ वाया घालवण्याची देखील काही ग रज नाही. तुम्ही कुठेही कॅशबॅक वापरू शकता. हे बिल भरण्यासाठी आणि रिचार्जिंगसाठी देखील वापरले जाऊ शकते.
घरबसल्या ऑनलाइन गॅस बुकिंगचे इतर पर्याय
- तुमचे गॅस सिलिंडर संपले असेल तर तुम्ही मेसेजद्वारेही बुक करू शकता. यासाठी सर्वप्रथम तुमच्या गॅस एजन्सीच्या मेसेजद्वारे गॅस बुक करण्यासाठी क्रमांक घ्या. त्यानंतर तुम्हाला मेसेज बॉक्समध्ये जाऊन गॅस एजन्सीचे नाव, स्पेस एसटीडी कोड आणि वितरकाचा फोन नंबर लिहून त्या नंबरवर पाठवावा लागेल.
- तुम्ही तुमचे गॅस सिलिंडर व्हॉट्स ॲपवरूनही बुक करू शकता. तुम्हाला फक्त व्हॉट्सॲपवर जाऊन रिफिल लिहायचे आहे. त्यानंतर तुम्हाला हा मेसेज 7588888824 या क्रमांकावर पाठवायचा आहे. यानंतर, काही स्टेप्स फॉलो करा आणि तुमचा गॅस सिलेंडर बुक होईल.
- गॅस सिलिंडरचेही ऑनलाइन बुकिंग करता येईल. यासाठी तुम्हाला Mylpg.in या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर येथे तुम्हाला तुमचा 17 अंकी एलपीजी आयडी टाकावा लागेल. आता युजर नेम, पासवर्ड आणि आवश्यक माहिती भरा. यानंतर तुम्ही गॅस सिलेंडर बुक करू शकता.