Brijbhushan Singh: ब्रृजभूषण सिंहला मोठा झटका; हाती लागले सबळ पुरावे,आरोप निश्चित करण्याचे कोर्टाचे आदेश

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार ब्रृजभूषण सिंह याच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या खटल्यात लैंगिक छळ आणि इतर आरोप निश्चित करण्याचे आदेश दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी दिले. बृजभूषणविरोधात सबळ पुरावे असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.

अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी प्रियांका राजपूत यांनी याबाबत आदेश दिले. सिंह यांच्याविरोधात कलम ३५४(महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा फौजदारी बळजबरी), ३५४ अ (लैंगिक छळ) आणि ५०६ (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले. मात्र, सहा महिला कुस्तीपटूंपैकी एकाने दाखल केलेल्या तक्रारीत पुरेसे पुरावे नसल्याचे कारण देऊन न्यायालयाने सिंह यांची निर्दोष मुक्तता केली. २१ मे रोजी औपचारिकरीत्या आरोप निश्चित केले जातील. या प्रकरणात सहआरोपी आणि कुस्ती महासंघाचे माजी सहायक सचिव विनोद तोमर यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्याचे आदेश दिले आहेत.
रश्मी बर्वेंनी फसवणूक केली, महाधिवक्त्यांचा युक्तिवाद; जातप्रमाणपत्राचा मुद्दा पोहोचला हायकोर्टात
ब्रृजभूषण याच्याविरुद्ध सहा महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषणाचे आरोप करून तक्रार दाखल केली होती. ब्रृजभूषणवर गुन्हा दाखल करावा यासाठी ऑलिम्पिक पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी जंतरमंतर आंदोलनदेखील केले होते. यामध्ये विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया हे कुस्तीपटू आघाडीवर होते.

Source link

brijbhushan sharan singhdelhi high courtsexual harassmentWFIमहिला कुस्तीपटू
Comments (0)
Add Comment